तुळजापूर रेल्वे स्थानक: मेल गाड्यांच्या थांबा करिता रेल्वे विभाग झाले गंभीर..

0

वर्धा : आज दिनांक 19. 12. 2023 ला रेल्वे प्रबंधक नागपूर विभाग येथे तुळजापुरला मेल गाड्यांचा थांबा संबंधित चर्चा बैठक आयोजित केली होती. विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष राम किशोर रामाजी शिंगनधुपे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीला देशोन्नतीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी पोहरे साहेब यांचे मोलाचे नेतृत्व योगदान मिळाले. तसेच माजी कार्याध्यक्ष एडवोकेट सनियाल साहेब, एडवोकेट नीरज खांदेवाले कार्याध्यक्ष नागपूर यांचे सुद्धा मोलाचे योगदान मिळाले. तुळजापुरला मेल गाड्यांचा थांबा 2018 मध्ये सुरू होता.अमरावती- जबलपूर -अमरावती गाडी क्रमांक 12159 /12160 तसेच अमरावती -अजनी -अमरावती 12119/ 12120 या मेल गाड्यांचा थांबा होता. तसेच पॅसेंजर गाड्यांचा सुद्धा थांबा होता परंतु 2019 मध्ये जगभरात कोरोना महा आजार आला असल्यामुळे त्यावेळी सर्वच रेल्वे गाड्या रेल्वे विभागाने बंद केल्या होत्या कोरोना काळ संपल्यानंतर रेल्वे विभागाने वरिल मेल गाडी सुरूच केल्या नाहीत .त्यामुळे या तुळजापूर स्थानक वरील 25 गावातील विद्यार्थी ,कामगार रेल्वे प्रवासी नागपूर-बुटीबोरी- वर्धा -अमरावती येथे शिक्षणाकरिता कामाकरिता प्रवासाला जातात. तुळजापूर रेल्वे स्थानक या परिसराला रेल्वे वाहतूक हाच एकमेव मार्ग असून कोणतेही सरकारी वाहतूक साधन येत नसून प्रायव्हेट साधन न परवडणारे आहे. तुळजापूर हे 25 गावातील विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता नागपूर -बुटीबोरी-वर्धा -अमरावती येथे रेल्वे वाहतूक जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून सोयीचा प्रवास असल्यामुळे प्रवास करीत असल्याचे दिसून येत होते. या साधनाशिवाय लोकांना पर्याय नाही तसेच रेल्वे प्रवासी व कामगार सुद्धा नागपूर -बुटीबोरी- अमरावती- वर्धा येथे नोकरी कामाकरिता डेली अप डाऊन करतात तुळजापूरच्या सर्वांच्या हिताचा व सोयीचा रेल्वे वाहतूकच एकमेव पर्याय असून वैद्यकीय व्यवस्था मेडिकल उच्च शिक्षण आयटीआय जुनिअर कॉलेज कृषी कॉलेज सायन्स कॉलेज कॉमर्स कॉलेज वर्धा नागपूर अमरावती येथेच आहे. तुळजापूरच्या 25 गावातील वरील परिस्थिती पाहता विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिंगनधुपे यांनी 2018 पासून विविध प्रकारे आंदोलने घेऊन रेल्वे विभागाचे लक्ष वेधले होते. फूट ओव्हर ब्रिज असो रेल्वे स्टेशनच्या उंच प्लॅटफॉर्म प्लाटाची उंची असो रेल्वे थांब याविषयी जनतेच्या हितासाठी विद्यार्थी वर्गाच्या हक्कासाठी सतत लढा.. गेल्या सहा वर्षापासून चालू असून आता मात्र वर्ष 2023 ला रेल्वे विभागाने गांभीर्याने लक्ष दिले असून फोटोवर ब्रिज मंजुरीचे व उच्च रेल्वे उंच उंच प्लॅटफॉर्मचे मंजुरीचे पत्रक 9/12/ 2013 रेल्वे विभागाने वर्धा-विराची जिल्हाध्यक्ष रामकिशोर रामाजी शिंगनधुपे यांना दिले यावर समाधानी न होता रेल्वे विभागाला सतत सूचित केले की विद्यार्थी वर्गाला शिक्षणासाठी गाड्यांचा थांबा आवश्यक असून पूर्ववत करा.विद्यार्थी यांची गैरसोय होत असून त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आहे तुळजापुरला पंचवीस गावाच्या वतीने आणखीन लक्षवेधी रेल्वे आंदोलन घेण्यात आले 13.12. 2023 ला बुधवार दिवस विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने आणि देशोन्नतीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे साहेब यांची मोलाचे योगदान लाभले मुलांना गाड्यांचा थांबा का मिळत नाही?असा प्रश्न केला होता. कारण काय? आपण घेतल्याशिवाय राहू नाही असे अभिवचन विद्यार्थीला वीराचे अध्यक्ष शिगनधुपे व पोहरेजी यांनी दिले “जपान देशांमध्ये एका विद्यार्थी करिता ऐका गावात रेल्वे गाडी जाऊ शकते तर भारतात (तुळजापूर)25 गावातील विद्यार्थी यांच्याकरिता का नाही .”बुधवार 13/12/ 2013 ला तुळजापूर स्थानकचे रेल्वे आंदोलन लक्ष विधी झाले होते.मात्र तात्काळ राज्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांना वर्धा जिल्ह्याचे लोकसभा सांसद रामदासजी तडस यांनी अश्विनी वैष्णव यांच्या नावाने तुळजापुरला दोन्ही गाड्यांचा थांबा द्यावा असे पत्र 13/12/ 2023 ला दिले.रेल्वे प्रबंधक नागपूर ला तुळजापुरला 13 /12 /23 ला झालेल्या आंदोलनाचे स्मरण पत्र आज दिनांक 19/12/23 ला झालेला चर्चा बैठकीमध्ये दिले गेले.मेल गाड्यांचा तुळजापुरला थांब्यासंबंधी चर्चा जवळजवळ एक तास झाली चर्चा मध्ये विदर्भ एक्सप्रेस चा थांबा सुद्धा द्यावा अशी मागणी करण्यात आली. गाडी क्रमांक 12105 /12106 रेल्वे विभागाने रेल्वे मंत्रालय दिल्ली येथे गाडी क्रमांक 12159 /12160 अमरावती -जबलपूर -अमरावती व गाडी क्रमांक 12119 /12120 अजनी -अमरावती -अजनी चा प्रस्ताव 15/12/2023 ला पाठवला असून एका आठवड्यात किंवा तीन दिवसात मेल गाड्यांचा थांबा तुळजापूर स्थानक ला मिळेल अशी माहिती रेल्वे अधिकारी यांनी दिली.सर्वांनी एकमेकांचे आभार मानले व चर्चा बैठक संपली बैठकीला कार्याध्यक्ष नीरज खांदेवाले माजी कार्याध्यक्ष एडवोकेट संनाल सर देशोन्नतीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे साहेब वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष रामकिशोर रामाजी शिगनधुपे उपाध्यक्ष व पूर्व विभागीय अध्यक्ष आशिष इंझनर पूर्व विभाग सचिव अरुण गावंडे मंगेश तिजारे प्रवीण चाफले अजय राजूरकर सुनील जयस्वाल स्वप्निल ठाकूर लक्ष्मण राऊत राजू वैद्य तिवारी रेल्वे विभागातर्फे अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक  पी एस खैरकर वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त  मनोज कुमार जी आर पी एफ चे अमित सर आधी

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!