त्या”अधिकाऱ्यांसह कंपनीवर गुन्हे दाखल करा.
🔥 पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर,
🔥चौकशी करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी
सिंदी (रेल्वे) : शहरातील सनदेची मोजणी करून नागरिकांना सिंदी पालिकेच्या वतीने कागदपत्रे देण्यात आले. मात्र, ही कागदपत्रे चुकीची दिल्याने मोजणी करणारी ठाणे येथील राणे कपंनी, नगर परिषद सिंदी रेल्वे तसेच उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय सेलू यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी मागणी किशोर भांदकर व सुधाकर वाघमारेसह शहरातील अन्य नागरिकांनी केली आहे.
गावठाणातील मालमत्तेचे स्वतंत्रपणे रेकॉर्ड करण्यासाठी व दप्तरी ठेवण्यासाठी सिंदी शहरात सिटी सर्वे करण्यात आला होता. नागरिकांना पूर्वसूचना न देता मालमत्तेची मोजणी केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. पालिकेने गावात दवंडी देऊन सनद वाटप केल्या. सनद वाटप करण्यापूर्वी सनद शुल्क म्हणून नागरिकांकडून बेहीशोबी पैसे उकळण्यात आले. यात एकाची मालमत्ता दुसऱ्याच्या नावे दाखविण्यात आली. तसेच एकच मालमत्ता काही कारण नसताना अनेक तुकड्यात विभागण्यात आली. या संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांनी तक्रार केली असता त्यांनी रेकॉर्ड दुरुस्तीच्या नावावर चुकीच्या नोंदविलेल्या मालमत्तेची मोजणी शुल्क म्हणून वेगवेगळे पैसे भरण्यास सांगितले. त्यामुळे आर्थीक नुकसानीसह मानसिक ताण सहण करावा लागता आहे. तयार केलेल्या सनद चुकीच्या असल्याचे ठराव घेऊन दर्शविण्यात आले. त्यांमुळे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीकडून पुर्नसर्व्हेक्षण करण्यात यावे, झालेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे शासनाच्या पैशाचा दुरूपयोग झाल्याने त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारावाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेल्या निवेदनातून केली आहे.
दोषींवर फौजदारी कारवाई करा
सनद दुरुस्ती संदर्भात आमदार कुणावार यांनी दोनदा सनद दुरूस्ती शिबीर घेतले. यात नागरिकांकडून अर्ज घेण्यात आले. मात्र, मोक्का पाहणी करून प्रत्यक्ष मोजमाप करण्यात आले नाही. सनदेत क्षेत्रफळ हे अंदाजे दर्शविण्यात आले आहे. दाखविलेल्या नकाशात मोजमाप दिलेले नसल्याने नागरिकांनी सर्वेक्षण करणारी कंपनी सनद वाटप करणारी पालिका तसेच भूमी अभिलेख सेलू कार्यालयाने फसवणूक केल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौसदारी गुन्हा नोंद करा अशी मागणी करण्यात येत आहे.दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24

🔥 पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर,