‘त्या’ घटननेचे वर्ध्यात निषेध; प्रतिष्ठेठान बंद करून केला निषेध

0

Sahasik news 24
@pramod panbude Wardha:
हिरकोडी (कर्नाटक) येथे जैन साधू आचार्य कामकुमारनंदी महाराज यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या पृष्ठभूमीवर आज गुरुवार 20 रोजी शहरातील जैन बांधवांनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला.
कर्नाटकात घडलेली घटना गंभीर आहे. देशात हजारो वर्षांपासून साधू-संत गावोगावी पायी भ्रमण करीत प्रवचनातून लोकांना धर्माबद्दल माहिती देतात. त्यांना अहिंसेचा पाठ शिकवतात, समाजाला सन्मार्गाला लावतात. मंदिरे व तीर्थक्षेत्रे बांधून भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात. आता त्यांच्यावरच विघ्नसंतोषी, धर्मद्रोही लोकांनी हल्ले करून जैन व हिंदू संस्कृती संपविण्याचे काम हाती घेतल्याचे जाणवत आहे. सरकारने अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्यात यावी व अश्या विघातक प्रवृत्तींना प्रतिबंध घालावा. अन्यथा, भविष्यात भारतीय संस्कृती व धर्म राहणार नाही, अशी भावना समाज बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बुधवारी समाज बांधवांच्या वतीने बंदची हाक दिली होती. या हाकेला प्रतिसाद देत शहरातील जैन बांधवांनी आपआपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!