दहावीच्या परीक्षेत देवयानी ईखार जिल्ह्यात प्रथम

0

Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज शुक्रवार 17 रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल 96.24 टक्के लागला असून 142 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. आष्टी येथील हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची देवयानी देविदास ईखार हिने 99.20 टक्के गुण घेउन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्या पाठोपाठ आर्वी येथील कृषक इंग्लिश विद्यालयाचा घनानील के. शिरपूरकर याने 98.40 टक्के गुण घेत द्बितीय तर त्याच विद्यालयातील कौस्तुभ चरपे याने 98.20 टक्के गुण घेत जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
दहावीच्या परीक्षेत 8 हजार 527 पैकी 8 हजार 423 मुले तर 7 हजार 635 मुलींपैकी 7 हजार 590 मुली असे एकूण 16 हजार 13 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत 7 हजार 986 मुले तर 7 हजार 428 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी 94.81 तर मुलींची 97.83 इतकी टक्केवारी आहे. यंदा टक्केवारीत सेलू तालुक्याने भरारी घेतली आहे. सेलू तालुक्याचा निकाल 95.58 टक्के लागला आहे. तर समुद्रपूर तालुका 83.78, कारंजा 70.58, वर्धा 83.68, आर्वी 86.88, आष्टी 86.84, देवळी 85.54 तर हिंगणघाट तालुक्याचा 81.53 टक्के निकाल लागला आहे. निकालात सर्वाधिक माघारलेला तालुका म्हणून सेलू तालुका पुढे आला आहे. या तालुक्याचा निकाल 95.58 टक्के लागला आहे. सन 2020 मध्ये वर्धा जिल्ह्याचा निकाल 80.52 टक्के होता. 2021 मध्ये त्यात वाढ होउन 87.40 टक्के झाले. तर 2022 मध्ये 96.24 टक्के निकाल लागला आहे.

………

पुलगाव येथील नगरपरिषद हायस्कूलचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या हायस्कूलमधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही.
……………….

तालुकानिहाय निकाल
वर्धा – 83.68 टक्के
आर्वी – 86.88 टक्के
आष्टी – 86.84 टक्के
देवळी – 85.54 टक्के
हिंगणघाट – 81.53 टक्के
कारंजा – 70.58 टक्के
समुद्रपूर – 83.78 टक्के
सेलू – 95.58 टक्के
………………..
घननिल जाणार प्रशासकीय सेवेत

आर्वी : जिल्ह्यातून द्बितीय क्रमांक पटकावलेला घननिल शिरपूरकर याला पुढे बी-टेक करून प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा मानस आहे. घननिल याने गायनाची तिसरी परीक्षा दिली असून त्याला बुद्धिबळ खेळण्याची सुद्धा आवड आहे. वडील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कार्पोरेशन लिमिटेड मुंबई विभागीय कार्यालय अकोला येथे विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असून आई गृहिणी आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, आत्या व गुरुजनांना दिले आहे.
………………..
वैद्यकीय क्षेत्रात जाणार कौस्तुभ

आर्वी : जिल्ह्यातून तृतीय स्थान मिळविलेल्या कौस्तुभ हरिभाऊ चरपे याला डॉक्टर व्हायचे असून त्याची तयारी तो करणार आहे. कौस्तुभला क्रिकेट खेळण्याची व टीव्ही पाहण्याची आवड आहे. त्याची आई पंचायत समिती आर्वी येथे लिपीक पदावर कार्यरत आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई व शाळेतील गुरुजनांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!