दहेगाव (गावंडे) गावाचा रस्ता झाला बंद,रेल्वे प्रशासनाचा तुघलकी कारभार…

0

🔥रस्त्या करिता गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.🔥रेल्वे विभागाचा विभागीय अभियंता गावातील नागरिकांना दूरध्वनीवरून देतो उडवा उडवी चे उत्तरे.

देवळी -/ दहेगाव गावंडे येथे जाने येणे करण्याकरिता असलेला रहदारीचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने या गावाचा रहदारी मार्गच बंद झाला असल्याकारणाने गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थी,दूध व्यवसायिक,शेतकरी,व्यापार वर्ग,संपूर्ण गावकऱ्यांना गावाबाहेर जाण्याकरिता रस्ताच नसल्याकारणाने त्यांना नदीकाठच्या बोगद्यातून पाण्यामधून जाणे येणे करावे लागत आहे.पावसाळ्याचे पाणी सध्या चार फुटापर्यंत साचल्याने चार दिवस येथील गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना गावा बाहेर पडता येत नसल्याकारणाने संताप व्यक्त होत आहे.गावकऱ्यांना नेहमीच जाण्या येण्याचा रस्ता रेल्वे रुळावरून जाणे येणे सुरू होते.पण रेल्वे विभागाने या रस्त्यावर बॅरिकेट्स व झाडे आडवे करून जाण्या येण्याचा रस्ता पूर्णतः बंद केला व गावकऱ्यांना नदीकाठी असलेल्या रेल्वे पुलाखालून जाणे येणे करावे असे सांगण्यात आले. या रस्त्याने गावकऱ्यांना जाने येणे करणे शक्य नसल्या कारणाने गावाचा रहदारीचा रस्ता बंद झाल्याने संपूर्ण वाहतूकच बंद होऊन संपर्क तुटला आहे.नदी जवळ असलेला पूल चिखल, पाणी,खड्डे,व नेहमी पाणी वाहत असल्याकारणाने कोणत्याही वाहनाची किंवा पायदळी वाहतूक होत नाही त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रेल्वे विभागाने केलेल्या रस्ता बंद च्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे नागरिकांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले.

🔥(गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया )🔥

आशिष गावंडे- रेल्वे विभागाचे इंजिनियर यांच्यासोबत दूरध्वनी वरून संपूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली असता संबंधित विभागीय अभियंता यांनी उडवा उडवी चे उत्तर देऊन पाण्यातून जाणे येणे करावे व पाणी कमी होईपर्यंत तिथेच बसून रहावे असे सांगून उडवा उडवी चे उत्तरे दिली. गावातून विक्री करिता जाणारे दूध शाळेतील विद्यार्थी व्यवसायिक यांचे जाणे येणे बंद झाल्याची माहिती देऊन सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष दिले. जुना रस्ता खुला करावा ही गावकऱ्यांची मागणी संबंधित अभियंताला सांगितली व रस्ता सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचे सांगितले.
हनुमान सालकर- दूध व्यवसायिक रस्ता बंद झाला असल्याकारणाने दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. माझे रोजचे 80 लिटर दूध वर्धा येथे विक्रीला जाते चार दिवसापासून माझे दूध विक्रीला नेता आल्या नसल्याने माझी आर्थिक नुकसान झाले.
संजय माजरखेडे शेतकरी- गावकऱ्यांची शेती रेल्वे लाईनच्या पलीकडे आहे रस्ताच बंद झाला असल्याकारणाने शेती कामाविषयक मजूर वर्ग जानेच बंद झाले असल्याकारणाने शेतीची कामे बंद झालेले आहे.
तसेच गावातील नागरिक प्रवीण घाटे,अजय बोरकर, सुनील मुंजेवार,रोशन कुंभारे, राजू धोंगडे,अनुराग नेहारे, यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना शाळेतील विद्यार्थ्यांचे शाळेला जाणे येणे बंद झालेले आहे तसेच मागील आठवड्यात जोरदार झालेल्या जोरदार पावसामुळे विद्यार्थी एक दिवस नदीच्या पलीकडे रात्री एक वाजेपर्यंत थांबलेली होती नंतर काही प्रमाणात नदीचे पाणी कमी झाल्यावर गावकऱ्यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांना गावामध्ये आणले. रस्ता बंद झाला असल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत असून दुर्लक्ष झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचे गावातील नागरिकांनी संवादातून सांगितले. जाण्या-येण्याकरिता जुन्या रहदारीच्या रस्त्यावर बोगदा बांधून देण्यात यावा असेही नागरिकांनी एक मुखी मागणी असल्याचे सांगितले.
(क्रमशः)

सागर झोरे साहसिक news-24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!