दीड वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेलेले आरोपीला पुणे वरून केली अटक.

0

वर्धा : 20 फेब्रुवारी 2022 रोजी आरोपी नामे रुपेश संतोष तुमडाम वय 21 वर्ष राहणार बोरगाव गोंडी याने एका अल्पवयीन मुलीस वर्धा येथुन फूस लावून पळवून नेल्याने पिडीत मुलीच्या वडिलांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 186/2022 कलम 363 भादवी चा गुन्हा दाखल करण्यात आला .सदर गुन्ह्यातील पिडीत मुलगी व आरोपीचा शोध न लागल्यामुळे सदरचा गुन्हा पुढील तपासाकरीता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष वर्धा कडे हस्तांतरित करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष वर्धा अंतर्गत सुरु असताना यातील अल्पवयीन मुलगी व आरोपी बाबत गोपनीयरितीने माहिती घेतली असता ते दोघेही चाकण पुणे परिसरात राहत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. त्यामुळे पुणे येथे पोलिस पथक पाठवून त्यांच्या शोध घेतला असता यातील पिडीत मुलगी व आरोपी पोलिस स्टेशन माहाळुंगे पुणे शहर हद्दीतील ग्राम निघोजे येथील फडके वस्तीमध्ये एका किरायाच्या रुम मध्ये मिळून आलेत.त्या दोघांनीही तेथून ताब्यात घेऊन वर्धा येथे आणून तपास केला असता यातील आरोपीने पिडीत मुलीस धुनिवाले मठ चौक वर्धा येथून तिचे अपनयन करून प्रथम तिला नागपूर येथे व त्यानंतर रायपूर जगदलपूर बिजापूर सिकंदराबाद मंचेरीयल व शेवटी पुणे येथे नेऊन किरायाची रूम करून राहत होता व आरोपी एका कंपनीमध्ये मजुरी काम करीत होता यातील आरोपीने अल्पवयीन मुलीचा वयाचा फायदा घेऊन तिच्या सोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर वांरवार लैंगिक अत्याचार केल्याचे आढळून आल्यामुळे आरोपीं विरुद्ध भादवी चे कलम 376(2) एन व कलम 4,6, लैंगिक अपराधापासून बालकांचं संरक्षण अधिनियम2012 हे प्रभावित होत असल्याने सदर गुन्ह्यात नमूद कलमाची वाढ करण्यात आली असून आरोपीस दिनांक25/10/2023 रोजी अटक करून पोलिस स्टेशन रामनगर येथे पुढील तपासाकरीता हस्तांतरित करण्यात आले पुढील तपास पोस्को सेल वर्धा करीत आहे.सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक नुरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालीपालेवाले पोलिस हवालदार निरंजन वरभे नितीन मेश्राम नवनाथ मुंडे शुभांगी पुसदेकर व सायबर सेलचे गोविंद मुंडे अनुप कावळे यांनी पार पाडली…

अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्युज 24 वर्धा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!