दीपचंद चौधरी विद्यालयाचा हॉकी संघ राज्यस्तरावर
सेलूचे खेळाडू करणार नेहरू हॉकी स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व
सेलू : जिल्हास्तरावर शालेय क्रीडा हॉकी स्पर्धेत पंधरा वर्षे वयोगटात अजिंक्यपद मिळविणाऱ्या दीपचंद चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन करीत विभागस्तरावर देखील अजिंक्यपद पटकावून हॉकीत आपला दबदबा कायम ठेवला.सेंट मेरी स्कुलच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात चंद्रपूरच्या संघाचा दणदणीत पराभव करून सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाचा मुलांचा हा संघ पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
दीपचंद चौधरी विद्यालयात हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू असलेल्या क्रीडाशिक्षिका.एस.बी. पोहाणे(वंजारी) यांनी आपल्या अनुभव व कौशल्याच्या जोरावर शाळेत हॉकीच्या खेळाची सुरुवात केली. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून सर्वसाधारणपणे या खेळात शहरी खेळाडूंचेच प्राबल्य दिसून येते. तरीही सेलूसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉकीच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या शिक्षिकेने अविरतपणे केले असून अनेक पारंगत खेळाडू त्यांनी घडविलेले आहेत.याचा प्रत्यय म्हणून नेहरू हॉकी चषकासाठी दीपचंद चौधरी विद्यालयाचा हा संघ पोहणे यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हॉकीत शाळेला प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यशामध्ये यशाचे शिल्पकार म्हणून हर्षद वाघमारे, नैतिक उराडे,अमन वाघमारे, मयूर कटरे, नैतिक तिजारे,गौरव धानकुटे,साहिल कोल्हे,यश दळवी,आयुष वाघमारे, किंशुक नागपुरे,तन्मय डायगव्हाणे, आदर्श तेलरांधे,अमित अवचट,प्रणय चव्हाण आणि नमन विंचुरकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.तसेच गोलरक्षक म्हणून धुलेश फंड याने उत्कृष्ट व चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांच्या संघाला हा विजय मिळविता आला.विजेत्या हॉकी संघाचे नेतृत्त्व यश दळवी या विद्यार्थ्याने यशस्वीरीत्या केले. त्याचप्रमाणे शाळेतील माजी विद्यार्थी चैतन्य कांबळे,निखिल बडेरे,चेतन बाबरे,ऋतिक दांडेकर,वृषभ डायगव्हाणे,आकाश बडेरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून कसून मेहनत करून घेतल्यामुळे हा विजय साकार करता आला.तसेच शाळेतील उत्साही व विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करणारे शिक्षक संजय बारी यांनी संघ व्यवस्थापकाची भूमिका चोखपणे सांभाळली तर सागर राऊत यांनी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली.
शाळेच्या प्राचार्या एस.बी. पोहाणे(वंजारी),संस्थेचे पदाधिकारी नवीन चौधरी,अनिल चौधरी,युवराज राठी व इतर पदाधिकाऱ्यांनी हॉकीच्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून तोंडभरून कौतुक केले. तसेच डॉ. कल्पना मकरंदे, व्ही.एम.चांदेकर, जी.बी.खंडागळे, प्रा. मंगेश वडुरकर, एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाबासकी देऊन त्यांचे अभिनंदन केले व राज्यस्तरावर विजयश्री होऊन शाळेबरोबरच गावाचे देखील नाव लौकिक करावे यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षकांना व वरिष्ठ खेळाडूंना दिले.
सागर राऊत सहासिक न्यूज-24