दीपचंद चौधरी विद्यालयाची विद्यार्थिनी जयश्री दंढारे मोझॅक आर्टमध्ये राज्यात तिसरी..

0

सेलू : महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे द्वारा आयोजित महात्मा फुले सभागृह पुणे येथे नुकताच राज्यस्तरीय कला उत्सव साजरा करण्यात आला. त्यात दहा विविध प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश होता. यांमध्ये द्विमितीय चित्र (मोझॅक आर्ट) निर्मिती स्पर्धेत सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयातील नवव्या वर्गाची विद्यार्थिनी कु. जयश्री शंकर दंढारे हिने राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने प्रावीण्य प्राप्त करून शाळेच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा रचला आहे.या कला महोत्सवात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून विविध कलास्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट कल्पना राज्य स्तरावर सादर करण्यात आल्या होत्या. यामध्ये वर्धा जिल्ह्यातून कु. जयश्री दंढारे हिची कलाकृती सर्वोत्तम ठरली होती. राज्यस्तरावर देखील कु. जयश्रीच्या अप्रतिम चित्र निर्मितीची सर्वत्र वाहवाह करण्यात आली. यावरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कलेची गुणवत्ता असून त्यांना प्रोहोत्साहन देण्याची गरज आहे, हे तिने दाखवून दिले. यासाठी तिला शाळेचे कलाशिक्षक सुभाष राठोड यांनी मार्गदर्शन केले. याच कलामहोत्सवात पारंपरिक लोकगीत गायन (पोवाडा) या स्पर्धेसाठी दीपचंद चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे राज्यस्तरावर सहभाग घेतला होता. त्यामध्ये रुपेश प्रमोद वाघमारे, सक्षम सचिन धानकुटे, वेदांत प्रमोद वाघमारे, चेतन चिंधुजी झाडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक डी. पी. झाडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.कला महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी त्यांनी उद्घोषणा करून कु. जयश्रीला प्रमाणपत्र प्रदान करून तिचा गुणगौरव केला. तसेच जिल्हास्तरावरील यशस्वी आयोजनातून योग्य निवड करून उत्कृष्ट बालकलाकार राज्यस्तरावर पाठवल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा येथील प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे व अधिव्याख्याता दीपाली बासोळे यांचा सुद्धा याठिकाणी गुणगौरव करण्यात आला.उपरोक्त विद्यार्थ्यांनी कला क्षेत्रात शाळेला राज्यस्तरावर नावलौकिक प्राप्त करून दिल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या सौ. एस. बी. पोहाणे (वंजारी), संस्थेचे पदाधिकारी नवीनबाबू चौधरी, अनिलबाबू चौधरी, युवराजजी राठी व इतर पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन करून तोंडभरून कौतुक केले. तसेच डॉ. कल्पना मकरंदे, व्ही. एम. चांदेकर, जी. बी. खंडागळे, प्रा. मंगेश वडुरकर, एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे, डॉ. प्रशांत चव्हाण, एस. बी. करडे, उमाकांत पिंपरापुरे, सुभाष कोवे, कु. विजया कुकडे, मिथुन हांडे व कु. जयश्री सोळंके यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कलाकारांचे अभिनंदन केले तर विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. बी. पोहाणे (वंजारी), मार्गदर्शक शिक्षक सुभाष राठोड व डी. पी. झाडे यांच्याबरोबरच आपल्या माता-पित्यांना दिले.

सागर राऊत साहसिक न्यूज -24

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!