दुचाकीवरील दोघे जागीच ठार, तर एक गंभीर जखमी
Sahasik news 24:
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
समोरून येणाऱ्या ट्रकवर दुचाकी धडकल्याने गंभीर अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्याच्या तळेगाव श्यामजी पंत येथील नागपूर – अमरावती महामार्गावर रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. नागपुर वरुन अमरावती कडे जाणार्या ट्रकवर तळेगाव श्यामजी पंत येथे बस स्थानक चाैकाकडूनन टि पाईंटकडे विरुद्ध दिशेने जाणारी दुचाकी ट्रकवर धडकली आहे.
प्राप्त माहितीनुसार राष्ट्रिय महामार्गावर नागपुरवरुन अमरावतीच्या दिशेने जाणार्या ट्रकवर विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी धडकली. दुचाकी ही तऴेगाव बसस्थानक चाैकाकडून टि पाईंटजवळील पेट्रोलपंपकडे जात होती. या अपघातात दुचाकीवरील किसन धुर्वे वय 75 व श्रीराम आहाके वय 45 दोघेही रा. आनंदवाडी जागीच ठार झाले. तर प्रभाकर फरफड वय 38 रा. आनंदवाडी हा गंभिर जखमी झाला.