देवळीत कापसाला मिळाला ७६०१ रु भाव.

0

अशोका,मधु इंडस्ट्रीज मध्ये कापूस खरेदीचा झाला शुभारंभ

स्थानिक औद्योगिक परिसरामधल्या अशोका इंडस्ट्रीज,आणि मधु इंडस्ट्रीज मध्ये शनिवारी सकाळी ११:३० वाजता कापूस खरेदीच्या शुभारंभ झाला.
सर्वप्रथम अशोका इंडस्ट्रीजचे संचालक अशोक कुमार टावरी यांनी वजन काट्याची पूजा केली त्यानंतर मधु इंडस्ट्रीजचे संचालक त्रिलोक कुमार टावरी यांनी प्रथम कापूस गाडी आणणारे शेतकरी खडचे रां.मलकापूर यांचे नारळ पान व दुपट्टा देऊन सत्कार केले.त्यानंतर शेतकरी राजाराम नागपुरे रां. जोडमहा व शेतकरी रामराव भोंग रां.डोनोडा,यांचे सत्कार मधु इंडस्ट्रीजचे संचालक त्रिलोक कुमार टावरी यांनी केले.
त्यानंतर लगेच कापसाचे भाव घोषित करण्यात आले त्यावेळी कापसाला सात हजार सहाशे एक रुपया भाव देण्याची घोषणा करण्यात आली त्यावेळी त्यांच्यासोबत बजरंग जिनिंग चे संचालक माणक सुराणा,माँ नरसाई जिनिंग प्रेसिंग चे जगदीश जोतवाणी, गोविंद जोतवानी व नरेश अग्रवाल,राजू बग्गा,राजू कपूर,संजय राठी,उमेश मुन, पप्पू टावरी हा व्यापारी वर्ग उपस्थित होते तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांमध्ये आशिष गावन्डे,आशिष खडसे,अनिल ओझा,मापारी किरण राऊत,मापारी हरीश कुमार ओझा,आदी लोक उपस्थित होते.उद्घाटन शुभारंभाच्या वेळी १०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आल्याचे संचालक मंडळाकडून सांगण्यात आले.

सागर झोरे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!