देवळीत कृषी केंद्रातून मुदतबाह्य औषधांची विक्री

0

Byसाहसिक न्यूज24
देवळी / सागर झोरे :
देवळी तालुक्यातील अनेक कृषी केंद्रामधून मुदतबाह्य शेतीविषयक औषधांची सर्रास विक्री सुरू आहे तरी कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे.तालुक्याच्या अनेक कृषी केंद्रांमधून मुदतबाह्य तन नाशक, कापसाच्या पिकावर फवारणी करणारे अनेक प्रकारचे औषध तसेच सोयाबीनच्या व तूर पिकावर चे फवारणी करणारे औषधी सर्रास विक्री केल्या जात आहे.जर एखाद्या शेतकऱ्याच्या लक्षात आले तर हे औषध चुकीने देण्यात आले आहे आम्ही ते परत करुन दुसरी औषध देतो असे म्हणून काही शेतकऱ्यांची समाधान केल्या जात आहे.परंतू ज्या शेतकऱ्यांच्या मुदतबाह्य औषधि आहे हे लक्षात येत नाही ते शेतकरी हे औषध आपल्या पिकावर वापरतात. त्याचा परिणाम असा होतो की शेतातील पिकावर रोगराई पसरते झाडांची वाढ होत नाही उत्पादनात घट येते परिणामी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.हे सर्व प्रकार देवळी तालुक्यात सुरू असतांनी मात्र कृषी विभाग याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत आहे.मुदतबाह्य औषधांच्या विक्री विषयी कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की माझ्याकडे दोन तालुक्याची जबाबदारी आहे त्यामुळे मी हे प्रकरण पंचायत समितीचे कृषी अधिकारी जंगले यांच्याकडे पाठवलेले आहे पुढील कारवाई तेच करणार असे त्यांनी सांगितले.परंतु कृषी केंद्रातून मुदतबाह्य औषधांची विक्री सर्रास सुरू असताना हे शासकीय अधिकारी हे प्रकरण एकमेकाकडे ढकलत आहे त्यामुळे बळीराजाने कोणाकडे जावे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुदतबाह्य औषधी विकणार्‍यावर कृषी अधिकारी कारवाई करण्यास का टाळत आहे?अशी चर्चा शेतकरी करीत आहे.या मुदतबाह्य औषधी विकणार्‍यांना कोणाचे अभय आहे याच्यामुळे ते सर्रास विकत आहे.या विषयी पंचायत समितीचे कृषी अधिकारी युवराज जंगले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की मी सध्या एका कार्यक्रमात आहे नंतर याविषयी तुमच्याशी बोलतो असे त्यांनी सांगितले…

मागील अनेक दिवसापासून मुदतबाह्य औषधांची विक्री देवळी तालुक्याच्या अनेक कृषी केंद्रातून सर्रास विक्री सुरूआहे. मी याची दूरध्वनीवरून कृषी अधिकारी यांना माहिती सुद्धा दिली. या मुदत बाई औषधांच्या वापरापासून शेत पिकावर अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत आहे त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे त्याचे जीवाचे हाल होत आहे वरून मुदतबाह्य औषधांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची सर्रास लूट होत आहे तरीही शासनाचा कोणताही अधिकारी याची दखल घ्यायला तयार नाही

मनोज नागपुरे शेतकरी ,गौळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!