देवळीत शीत शवपेटीचे लोकार्पण; पंकज तडस यांचा पुढाकार

By साहसिक न्युज 24
सुमित झोरे / देवळी:
छोटया अवधीसाठी मृतदेह सुरक्षित ठेवण्यात उपयोगी ठरणाऱ्या शीत शवपेटीचे सामाजिक कार्यकर्ते पंकज तडस यांच्या हस्ते देवळी येथे गुरुवारी २ जून रोजी लोकार्पण करण्यात आले. स्व. चंद्रभान तडस व्यावसायिक संकुलामध्ये हा लोकार्पण सोहळा पार:पडला. या प्रसंगी डॉ. श्रावन साखरकर व शरद आदमणे यांनी पूजन केले
एक ते दोन दिवस मृतदेह ठेवायचे असल्यास शीत शवपेटी देवळी शहरात उपलब्ध नव्हती. वर्धा किंवा हिंगनघाट येथून सदर शीतपेटीची व्यवस्था करावी लागत होती. ती फार खर्चाची आणि किचकट बाब असल्यामुळे सामान्य नागरिकांना फार अडचणीचा सामना करावा लागत होता. हिंदू धर्मीयांमध्ये सूर्य मावळल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार निषीद्ध मानल्या गेले असल्यामुळे तसेच बरेचदा मृतकाचा आप्त स्वकीय वेळेपर्यंत न पोचल्यामुळे, तूप आणि बर्फाचा उपयोग करून शहर वासियांना मृतदेह रात्रभर सुरक्षित करून ठेवावा लागत होता.देवळीकरांची ही गरज लक्षात घेऊन पंकज तडस यांनी स्व:खर्चातून १ लक्ष किंमतीची शीत शवपेटी उपलब्ध करून दिली. त्याचा लाभ देवळी शहर आणि परिसरातील ग्रामस्थांना होणार आहे. ३०० रुपये नाममात्र देखरेख शुल्क आकारून ही शीतपेटी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती पंकज तडस यांनी दिली.
यावेळी पंकज तडस, उमेश कामडी, संजय मुजबैले, दिलीप खाडे, संदीप पिंपळकर, अतुल कुऱ्हाटकर, प्रीतम वैद्य, अमन तडस, तेजस खोपाळ, वैभव शामकुवर, आतिष मुरार, मुर्लीधर गुजरकर, मुकुंद बजाईत, तेजस कडू, श्याम घोडे , संतोष मरघडे आदीची उपस्थित होती.