देवळी दहीहंडी स्पर्धेत धामणगाव प्रथम
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा आयोजित ही दहीहंडी स्पर्धा
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त रविवारी १७ सप्टेंबरला सलग नवव्या वर्षी बजरंग दल व विश्व हिंदू परीक्षद द्वारा आठवडी बाजार चौक देवळी येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या वेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक खा.रामदास तडस यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यावेळी त्यांच्यासोबत मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, उद्योजक मोहनबाबू अग्रवाल,अनिल कावळे, बबलू राऊत,ठाणेदार भानुदास पिदुरकर,अनुप अग्रवाल,उद्योजक विनोद घिया,राहुल चोपडा,राजेश बकाने,राजू बग्गा,आदी लोक उपस्थित होते,दहीहंडी स्पर्धा बघण्याकरिता गावातील महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक फ्रेंड्स ग्रुप धामणगाव, तर द्वितीय पारितोषिक आदर्श ग्रुप धामणगाव यांनी पटकाविले आणि साई बाल मंडळ अमरावती यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते एक लाख पन्नास हजाराचे बक्षीस वितरण करण्यात आले ही दहीहंडी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता बजरंग दल व विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते गजानन महल्ले,दिनेश शिरसागर,गोल्डी बग्गा,मोहन जोशी, अनिल शिरसागर,संजय कामडी, प्रवीण तेलरांधे,गजानन पोटदुखे, गजानन मेंडुले,अमोल गोडबोले, भारत पांडे, आधी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन प्रकाश चंभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शिरसागर यांनी केले.
सागर झोरे सहासिक न्यूज -24