देवळी परिसरातील विविध समस्याचे निराकारण करण्यासाठी खासदार तडस यांनी घेतली आढावा सभा

0

By साहसिक न्युज 24
देवळी/ सागर झोरे/
देवळी येथे नगरपरिषद मध्ये माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात येथे देवळीतील उद्भभवणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण करण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी पाणीपुरवठा,स्वच्छता विभाग, महाराष्ट्र विद्युत महावितरण विभाग,गावठाण,मार्केट,अतिक्रमण हटाव,शहरातील स्वर्गरथ,नगर परिषद येथील लिफ्ट,अल्पसंख्याकांचा निधी, अशा विविध समस्याचे निराकारण करण्यासाठी आढावा सभा घेण्यात आली होती.याप्रसंगी खासदार रामदास तडस यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली असून आठ दिवसातील समस्याचे निराकरण झालेच पाहिजे अशी स्पष्ट ताकीद दिली.यावेळी पाणीपुरवठ्याचा निपटारा करण्याचा मुद्दा,नवीन पाईप लाईन दुरुस्ती व ह्यांड पंप दुरुस्ती, अग्निशामक वाहन तसेच स्वच्छता विभागातील नाल्या सफाई, आरोग्यविषयक कामे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे,हायमास्ट काढून त्याच वार्डात गरजेच्या ठिकाणी हस्तांतरित करणे,गावठाण मधील केसेस नावावर करून देणे,अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याबाबत,तसेच रात्रीचे पेट्रोलिंग करण्याबाबत पोलीस स्टेशनला सूचना दिल्या,मीरननाथ मंदिर परिसरात पाणी पुरवठा करण्याबाबत,अल्पसंख्यांक निधी 50 लाख मंजूर करण्यात आलेले आहेत त्याची विल्हेवाट लावने,तसेच नगरपरिषद मधील लिफ्टची व्यवस्था करण्याबाबतअधिकाऱ्यांना सूचना दिल्या,तसेच देवळी शहरातील स्वर्गरथ बाबत चर्चा केली याप्रसंगी नऊ लाख खासदार निधीतून खरेदी करन्या बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या,तसेच बस स्टॉप ते काळा पूल पर्यत मेन स्टीट लाईट च्या विद्युत लोमाकाळणाऱ्या तार व उद्भभवणार्‍या समस्या यावर निराकारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या,यावेळी आढावा सभेचे अध्यक्ष खा-रामदास तडस,न.प.चे प्रशासक अधिकारी महेंद्र सूर्यवंशी,न.प.चे मुख्यधिकारी मिलिंद साटोणे,पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे,कर विभागातील प्रशासकीय अधिकारी न्यानेश्वर शिंदे, पाणीपुरवठा अभियंता पंकज गावंडे, बांधकाम अभियंता राजेश ढोले,तर आभार लेखापाल ज्ञानदेव दहिफळे यांनी मानले यावेळी न.प.चे कर्मचारी व विविध विभागातील कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!