देवळी पोलीस स्टेशनमधील काही कर्मचारी , अधिकाऱ्यांनी गाठला भ्रष्टाचाराचा कळस
साहसिक न्यूज 24
देवळी / सागर झोरे :
देवळी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मंगळवार 10 मे रोजी रात्रीला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मेंढे याला रंगेहात तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्याच्यावर भ्रष्टाचार विरोधी नियमाच्या आधारे कारवाई करून त्याला गजाआड केले.
एका गरीब चहाची टपरी चालविणाऱ्याला धाक दपट करुन पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या त्या पोलिसाला चहा टपरिवाल्याने भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात पकडून दिले ही घटना साधारण नाही ज्या एका साधारण चाय टपरी वाल्याने केले ते भल्या भल्या ला जमले नाही.देवळी पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचाराने कळस घातलेला आहे.देवळी पोलिसांच्या आशीर्वादाने देवळी शहरामध्ये खुलेआम सुरू असलेले अवैध व्यवसाय त्याच्यातून मिळणारी मोठी लाच त्यामुळे पोलिसांच्या मनात कायदा अंमलबजावणीची भीती राहिली नाही ते फक्त देवळी पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या तक्रार करत्याला ग्राहकाच्या रूपामध्येच पाहत असतात, ग्रामीण परिसरातील नागरीक या देवळी पोलिस स्टेशनच्या भ्रष्टाचाराने इतकी त्रस्त झाली आहे की ते तक्रार घेऊन यायला सुद्धा आता घाबरायला लागले आहे.ही देवळी पोलीस स्टेशनची अवस्था झाली आहे देवळी पोलीस स्टेशन मध्ये असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यापासून तर शिपाया पर्यंत चारचाकी वाहनांमध्ये ते प्रवास करतात त्यांच्याजवळ हे चार चाकी वाहने आली कुठून आणि त्यांना लागणारा रोजचा खर्च ते आणतात कुठून एक साधारण शिपायाच्या पगारामध्ये हे सर्व शक्य आहे का याच्यावरून असा अंदाज येतो , या ठाण्यातील एक महिला पोलिस कर्मचारी शहरातील प्रत्येक दारूवाल्याकडून 500 रुपये प्रमाणे वसूली सुरू केली आहे. की देवळी पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे वरिष्ठ अधिकारीही साहसिक न्यूज 24 कडे या महिलेचे पैशे घेतानाचे फोटो सुद्धधा प्राप्त झाले आहे. परंतु फोटो व नाव प्रसारित केले तर पोलिस विभागाची प्रतिमा ढासळेल या हेतूने फोटो प्रसारित करण्यात येत नाही. कारण साहसिक न्यूज 24 सामाजिक भान ठेवूनच वृत्त प्रकाशित करत असते. अश्या या पोलिस कर्मचाऱ्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक यांकारवाई करून सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासापासून न्याय द्यावा. व अश्या लाचखोर पोलिसांकडून पोलिस खात्याची होणारी मलीन प्रतिमा स्वच्छ करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.