देवळी शहरात बालविवाह मुक्त अभियानांतर्गत रॅलीचे आयोजन.
देवळी : वर्धा जिल्हात राबविण्यात येणाऱ्या कैलास सत्यार्थि चिल्ड्रन फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाने व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वतीने बालविवाह मुक्त अभियाना अंतर्गत १६ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवार ला जिल्हा समन्वयक संतोष घुगे यांच्या मार्गदर्शनात जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने बालविवाह मुक्त अभियान राबविण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता जनता विद्यालय येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळेस खा.रामदास तडस यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.यावेळेस डॉ.नरेंद्र मदनकर माजी उपाध्यक्ष नगर परिषद तथा सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या रॅलीत शहरातील जनता विद्यालय तथा ज्युनिअर कॉलेज, यशवंत कन्या शाळा,सृजन विद्यालय, नगर परिषद विद्यालय, एस एन जे महाविद्यालय तथा इतर शाळेतील विद्यार्थ्यां तथा शिक्षक सहभागी होऊन बालविवाह थाबंवा, बालविवाह मुक्त जिल्ह्य,तथा बालविवाह उपक्रमांतर्गत घोषवाक्य देऊन शहरातील लोकांचे लक्ष वेधण्यात आले.पोलीस स्टेशन सामोर सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तथा शिक्षकाचे स्वागत पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी केले.
यावेळेस पोलीसांकडून बंदोबस्त ठेवून रॅलीचे स्वागत ठिकाणावर करण्यात आले.ही रॅली रामदास तडस इनडोअर स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. यावेळेस खा.रामदास तडस , पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर डाॅ. नरेंद्र मदनकर, नगर परिषद कॉलेजच्या कपुर मॅडम, जनता ज्यु.कालॅजचे धर्मेश झाडे,प्राध्यापक पंकज चोरे,तथा सृजन कॉलेज, जनता कॉलेज यशवंत कन्या शाळेतील तथा देवळीतील सर्व कॉलेज तथा विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते.यावेळेस विद्यार्थी बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन विजय पचारे तथ प्रास्ताविक प्राध्यापक सचिन सावरकर यांनी केले आभार सि एस डबलु यांनी मानलेत.
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी