देव कुठल्याही रूपात येतात ते आज प्रत्यक्षात अनुभवलं…

0

Byसाहसिक न्युज 24
जळगाव / फिरोज तडवी:
22 julay 2022
आज डॉक्टर दिवस आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा व भाग्याचा दिवस मी शेख फिरोज शेख चिराग राहणार सीड फार्म मुक्ताईनगर माझा दहा वर्षाचा मुलगा शेख अवेश शेख फिरोज यास घरात इलेक्ट्रिक शॉक लागला व तो खाली कोसळला बेहोश पडला माझ्या घराशेजारील नासिर खान बशीर कुरेशी सोनू खान व अब्रार खान ह्या लोकांनी तात्काळ त्याच परिस्थितीमध्ये डॉक्टर जगदीश पाटील मुक्ताईनगर यांच्याकडे त्यास मोटरसायकलवर आणला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले परंतु प्रयत्न करून पाहू म्हणून अब्रार खान नासिर खान यांना सांगितले की तू तोंडाने श्वास दे बाकी डॉक्टरांनी हृदयाची मसाज करून व तात्काळ औषध उपचार करून दोन मिनिटानंतर माझ्या मुलाने श्वास घेतला डॉक्टरांनी नंतर औषध देऊन त्यास जीवदान दिले आजच्या दिवशी अब्रार खान व सर्व माझे शेजारी यांच्या प्रयत्नाने डॉक्टर जगदीश दादा पाटील यांनी माझ्या मुलाला जीवदान दिले आजच्या डॉक्टर दिनाच्या दिवशी डॉक्टर जगदीश दादा पाटील यांना खरंच अल्लाने ईश्वराने मला माणसातील देव दाखवून दिला त्यासाठी डॉक्टर जगदीशदादा पाटील मुक्ताईनगर यांचे खूप खूप आभार मानतो व त्याचे सहकारी आनंदा कोळी , पवन कांडेलकर यांचेही त्यांना असेच रुग्णसेवेसाठी अल्ल्हा बळ देवो हीच अल्ल्हा जवळ प्रार्थना करतो .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!