धक्कादायक : इझाळ्यात भानामतीच्या प्रकाराने खळबळ ; पोलिसांत तक्रार

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
घराचे कंपाऊंड मधील संडासचे खिडकीचे जाळीला बांधून असलेल्या कापडी बाहुलीच्या प्रतापाने घरात दोन ठिकाणी आग लागल्याची घटना तालुक्यातील इंझाळा(वेळा) येथील एका घरी घडली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे सांगितले. तर उपरोक्त घटना काळया जादूटोण्याचे किंवा भानामतीचे प्रकारातून घडली असल्याची कुटुंबाची धारणा झाली असून यामुळे संपुर्ण गावात दहशत पसरली आहे.
या प्रकरणी कुटुंबीयांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस काय कारवाई करणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आज शनिवारी सकाळी प्रांगणातील संडासचे खिडकीचे जाळिला गेल्या ५ दिवसांपासून एक कापडी बाहुली बांधून असल्याची माहिती मिळाली. यामुळे ही बाहुली आज सकाळी तेथून काढण्यात आली,
कुटुंबीयांना जादूटोण्याचा प्रकार असल्याचा संशय आला, महत्वाचे म्हणजे या बाहुलीवरती घरातील छोट्या मुलीचे नाव लिहिले होते, जादूटोणा किंवा भानामतीचे भीतीमुळे कुटुंबीयांनी ही चेटकीण बाहुली जाळण्याचा निर्णय घेतला.
ही चेटकीण बाहुली जाळताच तिकडे घराचे छपरावर वाळत घातलेल्या कपड्यांना तसेच आंतरवस्त्रासही आग लागल्याची घटना घडली. आग आटोक्यात येत असतांनाच इकडे पुन्हा दुसऱ्या खोलीमध्येसुद्धा आग लागली, येथील कुटुंबियांचे कपडे आगीत पुन्हा जळाले. हा जादुटोण्याचाच प्रकार असावा,या दहशतीमुळे सदर कुटुंबीय घाबरले असून झाल्या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.
घटनेची माहिती अ. भा. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे पदाधिकाऱ्याना देण्यात आली असता त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, हा प्रकार अंधश्रद्धेतून घडला असून यात तत्थ नसल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!