धक्कादायक…! वडिलांना व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यानं मारली धरणात उडी

0

प्रतिनिधी / गोंदिया :

गोंदियामध्ये 2013 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या एका तरुणाने परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून आपल्या वडीलांना व्हिडिओ कॉल करून भंडारा जिल्ह्यातील कवलेवाडा धरणात उडी टाकत आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना घडली आहे.
मृतक तरूणाचे नाव कृषिलेष राजू कनोजे वय वर्ष 29 असं आहे. कृषिलेष हा B.com पदवीधारक असुन तो स्पर्धा परीक्षा देत होता. कृशीलेष हा सन 2013 पासून स्पर्धा परीक्षा देऊन सुद्धा त्याला या स्पर्धा परीक्षेत यश येत नसल्याने तो नेहमी नोकरीच्या चिंतेत असायचा.
दरम्यान आज कृषिलेष हा घरी कोणाला काही न सांगता घरातील मोटरसायकलने कवलेवाडा धरणावर जावून आपल्या वडीलांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून सांगितले की, ‘मी कवलेवाडा डँम येथे आत्महत्या करीत आहे.’ असं सांगुन मोबाईलमध्ये व्हिडीओ कॉल रेकाँर्डिग करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्य़ेने सर्व जिल्हा हादरुन गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!