धनगर समाजाच्या शैक्षणिक जीआरमध्ये भोई व भोईच्या उपजाती यांना समाविष्ट करा

0

🔥 भोई समाज क्रांती दल विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांची मागणी

सिंदी (रेल्वे) : भटक्या जमाती मधील अ.ब.क.ड. या चारही वर्गाना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण व शिक्षणीक साहित्य देण्यात यावे, तसेच गुंज कॉन्व्हेन्ट सिंदी (रेल्वे) तालुका सेलू जिल्हा वर्धा या शिक्षण संस्थेमध्ये एन. टी. वर्गाला भटक्या जमाती ‘क’ धनगर समाजाच्या जी. आर. मध्ये समाविष्ट करा, अशी मागणी भोई समाज क्रांती दल विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांनी केली सहायक आयुक्त समाज कल्याण, वर्धा यांना निवेदनातून केली आहे.
भारतामध्ये शिक्षण अधिकार अधिनियम 2009 या कायद्यान्वये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे मुलांना शिक्षण मोफत आहे. परंतु, बऱ्याच ठिकाणी शासनाचे नित्यनियम पाडून इंग्रजी माध्यमाच्या प्रायव्हेट शाळा खोलण्यात आल्या आहे. त्यामुळे बरेचसे श्रीमंत लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रायव्हेट शाळेमध्ये नेऊ लागले. त्यामुळे गरीब लोक हे आपल्या पाल्यांना उत्कृष्ट शिक्षण द्यावे असे त्यांचे विचार असून इंग्रजी माध्यम मधील प्रायव्हेट शाळेची फी त्यांच्याकडून पूर्ण होत नसल्यामुळे ते नाईलाजाने आपल्या पाल्यांना प्राथमिक शाळेत शिक्षण देते त्यामुळे मुलांना पाहिजे तसे शिक्षण मिळत नाही. शिक्षण अधिकार अधिनियम 2009 या शासन अधिनियमानुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक ध ई शा – 2023/ प्र. क्र.99/ योजना – 2 नवीन प्रशासकीय भवन तिसरा मजला हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांच्या आदेशाने दिनांक 9 जून 2023 या तारखेला भटक्या जमाती ‘क’ धनगर समाजासाठी विद्यानिकेतन शिक्षण संस्था सिंदी (रेल्वे) तालुका सेलू जिल्हा वर्धा संचलित गुंज कॉन्व्हेन्ट सिंदी (रेल्वे) तालुका सेलू जिल्हा वर्धा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला भटक्या जमाती ‘क’ मधील धनगर समाजातील लहान मुलांना पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण व शैक्षणिक साहित्य मोफत आहे.
भोई समाज हा सिंदी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे व हा समाजाला शैक्षणिक बळ कमी आहे. त्यामुळे भोई व भोई समाजाच्या उपजाती यावर सरासर अन्याय होत आहे. परिणामी, 9 जून 2023 या शासन जी.आर. मध्ये भोई समाज व त्यांच्या उपजाती व ऐन. टी. वर्गाला यांना समावेश करण्यात यावा, 9 जून 2023 नुसार 100 मुलांची गुंज कॉन्व्हेन्ट सिंदी (रेल्वे) या संस्थेला जीआरची तरतूद केलेली असून त्यापैकी कमी मुले भटक्या जमाती ‘क’ मधील आढळून येते. त्यामुळे भटक्या जमाती मधील ‘अ ब क ड’ या चारही भटक्या जमातीचे वर्ग आहे. परंतु, या भटक्या जमातीमधील एन. टी. ‘क’ या वर्गाला प्राधान्य दिलेले आहे. भटक्या जमाती मधील ‘क’ गटाला पुरेसे विद्यार्थी होत नसल्यामुळे भटक्या जमाती मधील ‘अ ब क ड’ या सर्व वर्गाचा विद्यानिकेतन शिक्षण संस्था सिंदी (रेल्वे) संचलित गुंज कॉन्व्हेन्ट सिंदी (रेल्वे) तालुका सेलू जिल्हा वर्धा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश देण्यात यावा, तसेच ऐन टी वर्गाला भटक्या जमाती ‘क’ धनगर समाजाच्या जीआर मध्ये समाविष्ट करा, अशी मागणी भोई समाज क्रांती दल विभागीय अध्यक्ष पंकज बावणे यांनी केली आहे.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!