धनुष्यबाण कोणाचा? निवडणूक आयोग उद्या मारणार तीर उद्धव ठाकरेंना उद्या दुपार पर्यंत अंतिम मुदतवाढ
साहसिक न्युज24
नवी दिल्ली :‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे ? यावर आता उद्या, शनिवारी निवडणूक आयोगाकडून निकाल येण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत पडलेल्या वादळी फुटीनंतर पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हासंबंधीचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात अंतिम टप्यात पोहोचला.
शुक्रवार पर्यंत आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांच्याकडून करण्यात आलेल्या दाव्या संबंधी कागदपत्रे आणि उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने शिंदे गटाकडून शिवसैनिकांचे शपथपत्र आयोगाकडे सादर करण्यात आले.
जवळपास 7 लाख शपथपत्रे शिंदे गटाने आयोगाकडे सादर केल्याचे सांगितले जाते. बचावात्मक पावित्रा घेत ठाकरे गटाकडून आयोगाला कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीनंतर आयोगाने उद्या,शनिवारी दुपारी 2 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठीची अंतिम मुदत दिली आहे.
शनिवार पर्यंत ठाकरे गटाकडून कुठले उत्तर मिळाले नाही तर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आयोगाकडून सूचित करण्यात आले आहे.