धरण पाहायला जाणे बेतले जीवावर; दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जखमी

2

Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ कारंजा(घा):
15 ऑगस्ट च्या दिवशी तालुक्यातील हौशी नागरिक व तरुणांची नजीकच्या खैरी धरणावर तुडुंब भरलेले धरण पाहण्यासाठी दिवसभर येजा सुरू होती, उमरी येथील तेजस चोपडे वय 24 वर्ष व यशकुमार देशमुख वय 22 यांनीही धरण पाहण्याच्या बेत आखला, दुपारच्या सुमारास दोघेही मित्र दुचाकी क्र, MH/40 k 9785 ने खैरी धरणाकडे जाण्यासाठी निघाले, दरम्यान मदनी जवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली , त्यात तेजसच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर यशकुमार देशमुख हा गंभीर जखमी झाला, त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे, तरुण तेजसच्या मृत्यूने उमरी गावात हळहळ व्यक्त होत आहे

2 thoughts on “धरण पाहायला जाणे बेतले जीवावर; दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर एक जखमी

  1. कुरुल प्रतिनिधी म्हणून बातम्या पाहू शकतो

    कटू सत्य व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!