नकली पोलीस बनून वाटसरूस ला लुटले,१लाख ३५ हजाराचे सोने घेऊन आरोपी फरार
१लाख ३५ हजाराचे सोने घेऊन आरोपी फरार
देवळी:तालुक्यातील १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान तुकाराम घनश्याम वरफडे वय ५२ वर्ष रा. हूसनापूर.हे डवऱ्याचा दांडका तुटल्यामुळे वेल्डिंग मारण्याकरिता हुसनापूर वरून भिडीकडे जात असताना वर्धा यवतमाळ महामार्गावरील भिडी गावाच्या जवळील दोन अज्ञात व्यक्तीने आम्ही पोलीस आहे असे भासून १लाख ३५ हजार रुपयांचे फिर्यादींचे सोने घेऊन फरार झाले अशी तक्रार फिर्यादी तुकाराम वरफडे यांनी देवळी पोलीस स्टेशनला दिली.
हकीकत याप्रमाणे आहे की हुसनापूर निवासी तुकाराम वरफडे हे आपल्या दुचाकीने डवऱ्याचा दांडका तुटल्यामुळे त्याला वेल्डिंग करण्याकरिता भिडी येथे जात असतांना वर्धा यवतमाळ महामार्गावरील हुसनापूर व भिडी या मधामध्ये दोन उंच व्यक्ती अनोळखी इसमांनी दुचाकी वाहणाने येऊन फिर्यादीला थांबविले आम्ही पोलीस आहे चेकिंग चालू आहे गाडीची डिक्की खोला आणि तुमच्या जवळील दागिने काढून डिक्की मध्ये ठेवा असे फिर्यादीला सांगितले व त्यांच्या जवळील गळ्यात असलेली सोन्याचा गोप २३ ग्रॅम वजणाचा व ०६ ग्रॅम सोन्याची अंगुठी घेऊन आरोपींनी एका कागदी पुडीत बांधून डिक्की मध्ये ठेवण्यात आली.फिर्यादी हे भिडी गावाजवळली येताच फिर्यादीला मनामध्ये शंका येताच फिर्यादीने घाबरून ती पुडी उघडून बघितली असता त्यामध्ये २ लहान गोटे निघाले हे सर्व बघून फिर्यादीच्या लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे असे वाटून फिर्यादी परत त्याच महामार्गाने अनोळखी इसमाचा शोध घेण्याकरिता गेले असता त्यांना ते दिसून आले नाही तोपर्यंत वेळ निघून गेली होती, १५ हजार किमतीची अंगठी,१लाख २० हजार रुपये किमतीचा गोप,असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा सोने घेऊन आरोपी फरार झाले आहे फिर्यादीने तत्काळ देवळी पोलीस स्टेशन गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली.पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज -24 देवळी