नदी ओलांडताना वृद्ध गेला वाहून; प्रशासनाकडून शोध सुरू

0

sahasiknews.com
@pramod panbude Wardha :
समुद्रपूर तालुक्यातील आसोला येथील कवडू मुंडरे ६० नदी पार करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना काल २० रोजी सायंकाळी घडली. वृत्त लिहिस्तोवर वृद्धाचा शोध लागला नव्हता.
गुरुवार २० रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आलेल्या संततधार पावसामुळे आसोला गावाशेजारी असलेल्या नदीला पूर आला. यावेळी नदी पार करून बोडखा गावाकडे जाताना कवडू मुंडरे नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला. घटनास्थळी हजर असलेल्या दोघांनी नदीत उडी मारुन कवडूला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार कपिल हाटकर यांनी तातडीने गिरड पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहिभाते व तहसील कार्यालयाच्या कर्मचार्‍यांना माहिती देऊन घटनास्थळी पाठविले. ठाणेदार दहिभाते व पोलिस कर्मचारी, तहसीलदार कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेतला. रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. आज शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले. शोध पथकाने आसोला, डोंगरगाव, खाबाळा परिसरात शोध घेतला. शोध कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार कपिल हटकर व ठाणेदार सुनील दहिभाते यांनी दिली.
…………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!