नवीन तंत्रज्ञानाने अंतरगावचा दुग्ध व्यवसायाला मिळाली भरारी.

0

सेलू :परिसरातील अंतरगाव येथे हे गाव दुग्ध व्यवसायात नवीन भरारी घेण्यास तयार होत आहे. CSR अंतर्गत आय-सॉप फाउंडेशन व ई-वर्स.एआय यांच्या मदतीने अंतरगाव दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत मागील 6 महिन्यापासून येथे दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रकल्पा अंतर्गत अंतरगाव, हिवरा आणि झडसी येथील १२४दुग्ध उत्पादक शेतकरी कुटुंबाची उत्पन्न व पशूच्या आधारावर निवड करण्यात येऊन. येथे दुग्ध व्यवसायातील नवीन ज्ञान वाढीकरिता दुग्ध व्यवसायातील प्रमुख घटक चारा, खाद्य, संतुलित आहार, पशू आरोग्य, वासरांचे संगोपन, नवीन तंत्रज्ञान इत्यादी विषयावर कार्यशाळा घेवून लोकांचे दुग्ध व्यवसायातून अधिक उत्पन्न वाढ कशी होईल याचे प्रशिक्षण देण्यात आले. ए-वर्स.एआय च्या कॉऊ कनेक्ट बेल्ट येथील पशुंना लावण्यात आले आहे. त्यामुळे गाईच्या आरोग्याचे माहिती सूचना डीजीटली डॉक्टर व शेतकऱ्याच्या मोबाइल वर मिळतो. याद्वारे पशूचे शरीराचे तापमान, माजचक्र, हॉर्ट बीट, लोकेशन, आजार इत्यादी बाबींची पूर्व सूचना शेतकऱ्यांना मिळत आहे. तसेच या प्रकल्प अंतर्गत अधिक उत्पादन व जनावरास आरोग्य चारा निर्मिती करिता चारा बियाणे व मुरगास वाटप करण्यात आला. पशूसाठी नियमित जंतनिर्मूलन व लसीकरण, दुधाळ पशू करिता मोफत आरोग्य सेवा, नियमित पशू तपासणी कॅम्प, मोफत वीर्य कांडी लावण्याची सुविधा इत्यादीमुळे येथील दुग्ध व्यवसाय वाढीस अधिक मदत होत आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पशू आरोग्य, दुग्ध वाढ, दुधाच्या गुणवत्तेत सुधार, दुग्ध उत्पादित वस्तु निर्मिती, चारा व मुरघास निर्मिती, गुणवत्तापूर्ण व उच्च दूध क्षमता असलेल्या कलावडी निर्मिती इत्यादी कार्यक्रम येथे राबविण्यात येत आहे. काल प्रकल्प सुरू होण्याला 6 महीने झाले असल्याने या प्रकल्पाचा फायदा लोकांना किती मिळतो आहे याकरिता पाहणी व प्रोग्राम रिव्यू मीटिंग पार पडली. या मीटिंगला गावातील दुग्ध व्यावसायिक शेतकरी व रॉक्सवेल ऑटोमोशनचे दिपांजन बॅनर्जी आणि अंकीत सिंग, आय-सापचे गौरव वत्स आणि ई-वर्स.एआय संस्थापक आशिष सोनाकुसरे तर अंतरगाव येथील सरपंच यांच्या उपस्थित पार पडली. येथे सुरू असलेल्या उपक्रमाला शुभेच्या व्यक्त केल्या. यावेळी या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल कालोकार, वैद्यकीय प्रमुख डॉ. धनवीज यांनी प्रकल्पाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. तर प्रकल्पाचे स्थानिक समन्वयक नितेश बुधबावरे यांनी प्रकल्पाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!