नागझरी च्या वाहून गेलेल्या पूलातून धोकादायक वाहतूक सुरू
साहसिक न्यूज
सतिश अवचट:
पवनार: येथून सेवाग्राम जाणारा रस्ता व त्यावर असणारा नागझरी पुल मागील आठवड्यात २१ जुलै रोजी वाहून गेला मात्र ठेकेदाराने वाहून गेलेल्या पुलावर पुन्हा मुरूम गोटे टाकून सुरू केला पक्का पुल सुरू करण्या ऐवजी तात्पुरत्या स्वरूपात सुरू केलेला पुल पुन्हा सुरू केल्याने आज पुन्हा आलेल्या पावसात नाला दुथडी भरून वाहत असून त्यातून वाहतूक सुरू आहे. असे असताना मात्र ठेकेदार व सरकारी अधिकारी कुंभकर्मी झोपेत आहे. एखादी नागरिक या पुलात वाहून गेल्यावरच यांना जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला असून या रोडचे नियोजन शून्य काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.