निकाला आधीच मुक्ताईनगरात खडसे समर्थकांचा जल्लोष !
Byसाहसिक न्युज 24
पंकज तायडे / मुक्ताईनगर:
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याआधीच मुक्ताईनगर शहरात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.माजी मंत्री एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली असून यासाठी मतदान झाले आहे. काही तासांमध्ये याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तथापि, याआधीच मुक्ताईनगरात जल्लोष सुरू झाला आहे. शहरात निकाल लागण्याआधीच नाथाभाऊंच्या अभिनंदनाचे फलक लागले आहेत.
एकनाथ खडसे यांचे समर्थक हे कालपासूनच मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. तर काही जण आज सकाळी मुंबईत पोहचले. खडसेंचे निवासस्थान आणि विधानभवन परिसरात त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने असल्याचे दिसून आले. या समर्थकांना एकनाथराव खडसे यांचा विजय निश्चित वाटत आहे. तर हेच चित्र मुक्ताईनगरातही दिसून आले आहे.