निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने आसराबारीपाडा येथे पिण्यच्य पण्यची व्यवस्था त्वरित करण्यात यावी या करिता गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0

साहसिक न्युज24
यावल जळगाव /फिरोज तडवी:
यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी जनतेच्या समस्या ग्रस्त मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून आजही ते पुर्णपणे शासनाकडून मिळत असलेल्या सुखसुविधे पासून तसेच जिवनावश्यक मुलभूत गरजां पासून वंचित आहे. यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लेखी निवेदन गटविकास अधिकारी यांना वारंवार देऊन सुद्धा आमच्या समस्यांचे समाधानकारक निवारण झालेले नाही, तरी त्यांच्या समस्यांकडे आपले लक्ष वेधण्याकरिता आम्ही स्मरण पत्र गटविकास अधिकारी यांना देण्यात आले देण्यात आले असल्याचे निळे निशाण सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
चारमळी येथे पिण्यांचे पाणी व्यवस्था , रस्ते , गावात लाईटाची व्यवस्था , शाळा सुरळीत चालू असणे , अंगणवाडी चारमळी येथे स्थानांतर करणे , चारमळी येथिल आदिवासी मुलाना एक वर्ष शिक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या शिक्षकावर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे तसेच अतिरिक्त कारभार असणाऱ्या अंगणवाडी सेविकेची कारभार असल्यापासुन चौकशी करून अहवालाची प्रत देण्यात दयावी .

टेंभीकुरण येथे रस्त्याचे काम तात्काळ करणे

आसराबारीपाडा येथे तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे , आसराबारीपाडा वर्ड्री खु ग्रामपंचायतीत समाविष्ट करणे , आसराबारीपाडा येथे अंगणवाडी उभारण्यात यावी .धुळेपाडा हे सांगवी बु ग्राम पंचायतीत समाविष्ट करणे , धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी , धुळेपाडा येथे रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे . सांगवी बु. येथील भिल्ल समाजाकरिता दफनभुमीची समस्या तात्काळ मार्गी लावावी , अतिक्रमित घरे नमुना नंबर ८ ला लावावित.
अन्याय पाहता त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता वारंवार आम्ही संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयाकडे निवेदन दिलेले आहे . त्या अनुषंगाने आपण तात्काळ दखल घेऊन अनु . जाती जमातीच्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवून त्यांना न्याय दयावा अशी मागणी करण्यात आली.हे निवेदन साहाय्यक गट विकास अधिकारी सपकाळे व कक्षधिकरी सरवर तडवी यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर , महिला मंच जिल्हा प्रमुख नंदा बाविस्कर , जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे , महिला मंच तालुका अध्यक्षा लक्ष्मी मेढे , यावल तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे , ता . उपाध्यक्ष सैय्यद सखावत , तालुका युवक उपाध्यक्ष इकबाल तडवी ,सल्लागार राहुल तायडे , सिकाऱ्या पावरा , मिलिंद सोनवणे , सुनिल बारेला , देविदास बारेला , दिपक मेढे , नितिन कोलते व असंख्य महिला, पुरुष आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!