निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात आज मतदानासाठी स्थानिक सुट्टी

0

 

प्रतिनिधी/ वर्धा:

वर्धा जिल्ह्यात 19 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायती क्षेत्रात मतदान होणार आहे तेथे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

मतदान होणा-या ग्रामपंचायतींमध्ये वर्धा तालुक्यातील साटोडा, सेलू तालुक्यातील देऊळगाव व सेलडोह, देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक, आकोली, कवठा (रेल्वे), तळणी भा., आवी तालुक्यातील वर्धमनेरी, काचनूर, देऊरवाडा, बेनोडा, आष्टी तालुक्यातील बेलोरा (खु), माणीकवाडा, कारंजा तालुक्यातील जऊरवाडा, सेलगाव ल, चिंचोली, आजनादेवी तर हिंगणघाट तालुक्यातील टेंभा व चिकमोह याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका मुक्त, स्वच्छ व पारदर्शक होण्यासोबतच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा म्हणून याठिकाणी मंगळवार दिनांक 21 डिसेंबर रोजी स्थानिक सुटी जाहिर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिका-यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!