नीट फाउंडेशन तर्फे दीपचंद चौधरी विद्यालयात डिजिटल लॅबचे उदघाटन.

0

सेलू : स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयात हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत एन.आय.आय.टी.(नीट) फाउंडेशनच्या वतीने ‘डिजिटल साक्षर’ उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये नीट फाउंडेशनच्या चमूने शिक्षकांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण देऊन शाळेसाठी तीन डिजिटल स्मार्ट बोर्ड भेट स्वरूपात दिले व डिजिटल लॅबची उभारणी करून विद्यार्थाना आधुनिक साधन तंत्राच्या मदतीने अध्ययन-अध्यापन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने डिजिटल लॅब सर्वांसाठी खुली करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवीन चौधरी व प्रमुख पाहुण्या म्हणून सेलू नगर पंचायतच्या नगराध्यक्षा कु. स्नेहल देवतारे या उपस्थित होत्या. तसेच अनिलबाबू चौधरी, नीट फाउंडेशनच्या समन्वयिका मीनाक्षी अभ्यंकर, मुख्याध्यापिका एस. बी. पोहाणे, मंगेश वडुरकर, व्ही. एम. चांदेकर, सागर राऊत यांची मंचावर विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उदघाटन करण्यात आले. त्यानंतर मंचकावरील पाहुण्यांचे पुष्पवृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर व्ही. एम. चांदेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून डिजिटल साक्षरता अभियानाची माहिती देऊन नीट फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचा उहापोह केला.आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आणि सेवा ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षण व सोशल मीडिया यासाठी आपल्याला मोबाईल अथवा संगणक व्यवस्थित वापरता येणे, ही काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे उपलब्ध इलेक्ट्रानिक संसाधनांचा संपूर्णतः वापर करण्याची क्षमता म्हणजेच डिजिटल साक्षरता होय. शिक्षणाच्या प्रवाहात ग्रामीण विद्यार्थी मागे राहू नये म्हणून हिंदुस्थान पेट्रोलिअमच्या सहकार्याने नीट फाउंडेशनद्वारे हा समाजशील उपक्रम राबविल्या जात असल्याचे प्रतिपादन नीट फाउंडेशनच्या मीनाक्षी अभ्यंकर यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील या उपक्रमाच्या कार्याची स्तुती करून ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी ही एक चांगली संधी असून अध्ययन व अध्यापनाचे कार्य उत्तमप्रकारे घडावे, असे मत व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. बी. पोहाणे यांनी सुद्धा स्तुत्य उपक्रमाचे गुणगान केले व नीट फाउंडेशनचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी प्रशिक्षत शिक्षकांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश कनोजिया तर आभारप्रदर्शन लीना भोमले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेघा चंदनखेडे, ज्योती उमाटे, गीतांजली भोगे, मनीषा सहारे, भारती हेमके, एच. जे. मुडे, प्रशांत चव्हाण, उमाकांत पिंपरापुरे, सचिन तेलरांधे, तुषार धर्मूळ, मिथुन हांडे, आदी शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

सागर राऊत साहसिक न्यूज -24 सेलू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!