नेमका बिबट्याचा मृत्यू कशामुळे?कावीळ दोन तासात कसा समजू शकतो?
प्रतिनिधी/ वर्धा:
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ येथे काल दुपारी आढळून आलेल्या बिबट्याचा करुणाश्रम येथे रात्री मृत्यू झाला. लिव्हर खराब आणि काविळ ने त्याचा मृत्य झाल्याची माहिती पीपल्स फॉर अनिमलचे आशिष गोसावी यांनी दिली.
काल दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बिबट्या हिंदी विद्यापीठात आढळून आला होता. पीपल्स फॉर अनिमल, वन विभाग, हिंदी विश्व विद्यापीठचे सुरक्षा रक्षकांनी २ तासात बिबट्याला बंदिस्त केले होते. पीपल्स फॉर अनिमलचे कौस्तुभ यांनी ५ फुटवरून बिबट्याला बेशुद्ध केले त्यानंतर त्याला करुणाश्रम येथे आणण्यात आले. परंतु तो बिबट्या शुद्धीवरच आला नाही .. आणि रात्री एक वाजता त्याचा मृत्यू झाला. परंतु, लिव्हर खराब आणि शेवटच्या स्टेजचा कावीळ यामुळे त्याचा मृत्यू झाला. कोणताही अहवाल प्राप्त होण्याआधीच डॉक्टरांना किंवा वनविभागांना त्याचा त्याला काव्य शेवटच्या स्टेजवर आहे हे कसे काय समजले? वनविभागाच्या आता हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येतात वनविभागाने सर्व रिपोर्ट बदलण्याचे काम सुरू केले.. असल्याची चर्चा सुद्धा परिसरात आहेत… तसेच वनविभागाच्या काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की , कोणत्याही जनावराचा आजाराचा फॉरेन्सिक रिपोर्ट यायला कमीत कमी 72 तास लागतात .. आणि येथील डॉक्टरांनी बिबट्याला पकडतात कावीळ जाहीर केले इथेच कुठेतरी संशय निर्माण होत आहे..