नेशनलाइज असलेली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवळी येथील कर्मचार्‍यांची सरदारनी असलेल्या बँक मॅनेजर चे नवीन नियम: दुपारच्या लंच टाईमापासून बँकेच्या मुख्य दरवाज्याला कुलूप लावून जेवण्याची नवीन पद्धत.

0

देवळी तालुका प्रतीनिधी:

देवळी शहरामध्ये एकमेव तालुका स्तरावर नेशनलाईज महाराष्ट्र बँकेची शाखा असून गेल्या काही वर्षापासून चांगल्या व शेतकर्‍यांना उत्तम सेवा देणारी महाराष्ट्र बँक म्हणून महाराष्ट्र बँकचे नाव होते. तसेच तालुक्यातील बर्‍याच प्रमाणात खातेधारकांचे, शेतकर्‍यांचे खाते या बँकेत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी बँकेचे उंबरठे झिजवावे लागते, अशातच गाव-खेड्यात येण्या-जाण्याची उत्तम सोय लालपरी बंद असल्यामुळे खातेधारकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. येवढा मानसिक तनाव असताना सुद्धा महाराष्ट्र बँकेचे खातेधारक हे बँकेच्या कामानिमित्याने बँकेत गेले असता तेथील व्यवस्थापक मॅनेजर यांनी चक्क लंचच्या टायमात बँकेच्या रांगेत तसेच बँक परिसरात उभे असलेल्या लोकांना बाहेर काढत बँकेच्या मुख्य प्रवेश द्वाराला कुलूपचं लावले.

अशा पद्धतीचे बँक मॅनेजरचे व्यवहार अतिशय अशासकीय नियमावलीचे तसेच असामाजिक तत्वाचे दिसून येते. बँक व्यवस्थापक हा नेहमी लोकांच्या संपर्कात असणारा एक मदतगार व्यक्ति असावा परंतु देवळी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पदस्थ व्यवस्थापिका ह्यांच्याकडून नागरिकांशी असा भेदभाव हा असह्य व असामाजिक असल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहेत. तसेच अश्या भेदभावाने ग्रसित असलेल्या व्यवस्थापिकेला तत्काळ बदली करून सामान्य नागरिकांची जाणीव असणारा व्यवस्थापक आनावा व बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून जेवण करण्याची प्रथासुद्धा बंद करण्याची मागणी व त्यातही महत्वाचे म्हणजे बँकेमध्ये नागरिकांना बसण्याची सुलभ व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!