नोटा द्या…गोठा घ्या..! बोदवड पंचायत समिती गोठा अनुदानाच्या फाईली गायब

0

Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर/ पंकज तायडे:
जळगाव जिल्हातील बोदवड येथील पंचयत समिती विविध अडचणीच्या विळख्यात सापडली असून शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी गुरांचा गोठा अनुदान योजना अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या फाईलीच सापडत नसल्याची तक्रार आहे.
गोठा अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत असून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांच्या विचित्र वागण्याचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रोहयो विभागात लाच खोरीने पुन्हा वर काढले असुन ग्रामसेवकासहित गटविकास अधिकारी काथेपुरी यांचे असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय बनलेला आहे.
बोदवड तालुक्यातील वराड येथील शेतकरी यांनी गुरांच्या गोठ्याचे प्रकरण जुलै २०२१ पासुन पंचायत समिती कार्यालयात दाखल केलेले आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी सदरिल शेतकरी पंचायत समिती कार्यालयातील रोहयो विभागाच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांना भेटल्यावर अडीच तास शेतकऱ्याला ताटकळत ठेवत त्यांच्या उर्मट बोलण्याचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्रस्त शेतकऱ्याच्या पुत्राने नगराध्यक्ष आनंदा पाटिल यांना सदरील प्रकार कळविल्यानंतर ते नगरसेवक गोलु बरडिया व इतर कार्यकर्त्यांसहित घटनास्थळी हजर झाले.
यावेळी प्रकरणांच्या फाईलीच गायब झाल्याचे निदर्शनास आले. तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत गटविकास अधिकारी काथेपुरी यांना सदरील प्रकार लक्षात आणुन दिल्यावर कामात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला. तसेच येथे पैसे दिल्या शिवाय कामच केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली, यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटिल नगरसेवक गोलु बरडिया, प्रकाश पाटिल, दिपक माळी, अमोल व्यवहारे, सचिन राजपुत, गजानन बेलदार, नितिन शिमरे, सुनिल पाटिल यांच्यासह अन्य असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!