परिवर्तन जनसंवाद यात्रेचे सिंदी रेल्वे शहरात जेसीपीद्वारे पुष्पवर्षाव करीत भव्य स्वागत.

0

दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून दिल्याबद्दल अतुल वांदिले यांचे सिंदी शहरात भव्य स्वागत

संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले – सलील देशमुख

सिंदी (रेल्वे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी पोहना येथील महादेव मंदिरातून झाली होती. या यात्रेचे १७ डिसेंम्बर रोजी सिंदी शहरात आगमन झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदी शहरद्वारा जेसिपीद्वारे पुष्पाचा वर्षाव करीत ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या २८ व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सलील देशमुख यांनी उपस्थित राहुत परिवर्तन जनसंवाद यात्रेचा सभेला संबोधित केले. संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले आहे. परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अतुल वांदिले व त्यांच्या सहकार्याने २८ दिवस घरी न जाता २८८ गावांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या आहे. त्यांच्या या संघर्षाला २०२४ मध्ये यश नक्की मिळेल असे प्रतिपादन युवा नेते सलील देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस किशोर माथनकर, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोक वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, महिला जिल्हाध्यक्ष ज्योति देशमुख, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, माजी नगराध्यक्ष संगीता शेडे, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, बबनराव दाभणे, प्राचार्य अशोक कलोडे, मोहन अंबोरे, बाजार समिती संचालक गणेश वैरागडे, महादेव वांदिले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, शिवसेनेचे सचिन लांबट, सामाजिक कार्यकर्ते राजु तळवेकर, फिरोज बेरा, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सुनील शेंडे, माजी नगरसेवक सुमन पाटील, कमलेश डगवार, गजानन धाबडधुसके, हेमराज झाडे, नितेश झाडे, जगदीश बोरकर, अफजल बेरा, बबलू खान, वसंतराव सिरसे, नितीन देशमुख, जावेद मिर्झा, संदीप उईके, सुधाकर वाढई, राजू मेसेकर, बंडु लोणकर, नदीम भाई, बबलू भाई, अनिल लांबट, गणपत ढगे, अजय पर्बत, अरुण सावरकर, घोडे पाटील, सिमा तिवारी, सुचिता सातपुते, सुजाता जांभुलकर, सविता गिरी, विद्या गिरी, मिनाक्षी ढाकणे, दिपाली रंगारी, सुमित तळवेकर, निलेश तकवेकर, बंटी बेलखोडे, सुमित शेंडे, अतुल कारवडे, सोनू बोरकर, राहुल बेले, रवी राणा, अनुप वाघमारे, सुमित वाघमारे, सुनील सोनटक्के, हेमंत झाडे, सोनू झाडे, रवी वाघमारे, रोशन तडस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!