पळसगाव (बाई) येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना,

0

अवध्या जगाला अहिंसेची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध

सिंदी (रेल्वे :- पळसगाव (बाई) येथे थायलंड येथून तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची शाक्य मुनी बौध्द विहार येथे प्रतिष्ठापणा करण्यात आली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहत तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.अवघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. त्यांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्याची प्रेरणा देतात, शांती देतात असे विचार अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
पळसगाव (बाई) गावातील दिनेश पाटील व अविनाश पाटील यांच्या सहकार्याने ही मूर्ती थायलंड येथून आणण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, बौद्ध विकास समितीचे अध्यक्ष वनिताताई कुत्तरमारे, अमोल कांबळे, गजानन धाबडधुसके, राहुल पाटील, अरुण भट, माजी सरपंच तुळसा माडे, उपसरपंच शारदा बोरकुटे, चेतन वावरे, प्रणय बोरकर, प्रमोद देवतळे, देविदास अतकरे आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दिनेश घोडमारे सहासिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!