पहूरात दोन युवकांवर धारदार शस्त्राने केला प्राणघातक हल्ला

0

By साहसिक न्युज 24
पंकज तायडे/ मुक्ताईनगर:
पहूर जामनेर येथे रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास पेठ ग्रामपंचायत इमारतीच्या खाली अंडापाव गाडीववर सतिष कडुबा पांढरे व राहूल नाना भोंडे या युवकांवर चाकूने सपा सप वार करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर प्राणघातक हल्ल्यामुळे पहूर येथील जनता भयभीत झाले आहे. तीनही हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान रात्रभर पहूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेटे, पोलीस शिपाई गोपाल माळी,भरत लिंगायत, ईश्वर देशमुख, विनय सानप, रवींद्र देशमुख,ज्ञानेश्वर ढाकरे यांनी रात्रभर परिसरात पेट्रोलिंग करून वरखेडा शिवारातून शेतीच्या बागेतून हल्लेखोर लपून असल्याची माहिती मिळताच सापळा रचून दोघांना अटक केली.यात शुभम रमेश पाटील, बंडू एकनाथ पाटील, या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून यातील रोहित दीपक थोरात उर्फ चिक्या हा फरार झाला आहे त्याचा पोलीस तपास करीत आहे.शुभम रमेश पाटील व बंडू एकनाथ पाटील या दोघा आरोपींना घटनास्थळापासून पहूर बस स्थानक मार्गे थेट पहूर पोलिस स्टेशन पर्यंत हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढण्यात आली. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेले सतीश कडूबा पांढरे व राहुल नाना भोंडे या भंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना केले असून आज दुपारी पहूर पोलीस स्टेशनला विलास कडूबा पांढरे राहणार खंडेराव नगर पहूर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रोहित दिपक थोरात उर्फ चिक्या शुभम रमेश पाटील बंडू एकनाथ पाटील या आरोपीं विरुद्ध पहूर पोलिस स्टेशनला भादवि कलम 307,326,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!