पाल आश्रमातील वृध्दाना आवश्यक साहित्य वितरण,केले वेदनांनी ग्रासलेल्या जेष्ठांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हेचं माझे पुण्य संचय – डॉ.कुंदन फेगडे
साहसिक न्युज24
यावल जळगाव / फिरोज तडवी:
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील थंड हवेची ठिकाणं असलेल्या पाल येथील वृध्दापकाळात थकलेल्या शरिरास आधाराची गरज असते यात इतर साहित्यांपेक्षा मानसिक आधार अधिक महत्वाचा असतो तेव्हा पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे असे प्रतिपादन डॉ. कुंदन फेगडे यांनी केले , ते पाल येथील संत लक्ष्मण चैतन्य आश्रम श्री वृंदावन धाम पाल मध्ये साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. आश्रम मधील जेष्ठांना काय आवश्यक आहे हे जाणुन घेत त्या नुसार त्यांनी साहित्य खरेदी करून हे साहित्य जेष्ठांना वितरण करण्यात आले. वेदनांनी ग्रासलेल्या जेष्ठांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य हेचं माझे पुण्य संचय असे देशील डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगीतले.
पाल ता. रावेर येथील सातपुडायच्या कुशीत संत श्री. लक्ष्मण चैतन्यजी आश्रम श्री वृंदावन धाम पाल येथे आश्रम आहे. या आश्रमातील जेष्ठांना काही आरोग्य विषयक साहित्यांची आवश्यकता आहे ही माहिती आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांना मिळाली तेव्हा जेष्ठांप्रती आदर बाळगणाऱ्या डॉ.फेगडे यांनी थेट वृंदावन धाम आश्रम येथे संपर्क साधला व येथील जेष्ठांना अत्यावश्यक साहित्य काय काय हवे आहे याची माहिती घेतली व स्वत:हा पुढाकार घेत पदरमोड करीत त्यांनी आरोग्य विषयक विविध साहित्यांची खरेदी केली आणी सन्मानाने हे साहित्य स्वत:हा आश्रमात जावुन जेष्ठांना त्यांच्या गरजे नुसार ते ते साहित्य वितरण केले.व पंडीत दिन दयाल उपाध्य यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकास मदत करतांना ती आदरयुक्त दायीत्वातुन केली गेली पाहिजे या अनुशंगाने आपण आपल्या परीने जेष्ठांसाठीचे कार्य करीत असल्याचे प्रसंगी त्यांनी सांगीतले या कार्यक्रमा प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे सागर लोहार मनोज बारी आदींची उपस्थिती होती
या साहित्याचे वितरण
वृंदावन धाम आश्रमातील जेष्ठांना दैनदिनी जिवनात उपयोगा करीता कमोड खुर्ची, खुर्चीच्या आधार साठी काड्या, कमरेचे पट्टे, माणक्याचे पट्टे सह विविध साहित्य आणी आरोग्य विषयक वस्तू वाटप केल्या.
प्रत्येकाने दाखवावे दायीत्व.
समाजातील जेष्ठांप्रती आदर हे आपले संस्कार असुन आपल्या सांस्कृतीत वयोवृध्दा प्रतिचा सन्मान करणे आहे तेव्हा जेष्ठ कोणी ही असो ते आपल्याला पितृतुल्य असतात म्हणुन त्यांच्या करीता प्रत्येकाने दायीत्व दाखवले पाहिजे
डॉ. कुंदन फेगडे, अध्यक्ष आश्रय फाऊंडेशन रावेर –यावल.