पिंपळगाव (देउळगाव) येथे अंगावर वीज पडून ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू

0

साहसिक न्युज24
प्रमोद पाणबुडे / वर्धा:
शेतात काम करीत असतांना अचानक विजांसह पाऊस आला, पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाच्या आडोशाला गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, लक्ष्मण चंपत नागतोडे वय ५२ असे मृत पावलेल्या इसमाचे नाव आहे, ही घटना दिनांक १८ मंगळवारी दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव (देऊळगाव) शिवारात घडली,
याबाबत मिळालेली माहिती अशी की मृतक शेतकरी लक्ष्मण नागतोडे हे आपल्या शेतात सोयाबीनची सवंगणी करीत होते, दरम्यान आज विजांच्या कडकडाटासह पाऊस आला, पावसा पासून बचाव करण्यासाठी त्यांनी शेताच्या धुऱ्यावरील झाडाचा आसरा घेतला, त्या दरम्यान वीज कडाऊन त्यांच्या अंगावर पडली, त्यात लक्ष्मणराव चंपत नागतोडे हे गंभीर झाले, त्यांना लागलीच सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले, तेथे त्यांचा उपचारादरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!