पुरात बाईकने पूल ओलांडणाऱ्या अमयचा सापडला मृतदेह

0

 

 

By साहसिक न्युज 24

इकबाल पहेलवान/ हिंगणघाट:

वर्धा जिल्हात सततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या पिंपळगाव येथील तरुण अमेष रविंद्र लिहितकर याचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजताचे दरम्यान उघड़किस आली.शुक्रवारी सकाळी हा युवक त्याचे पिंपळगाव येथील घरुन अवघ्या १ किमीवर असलेल्या हिंगणघाट येथे मोटरसाइकलने जाण्यास निघाला होता. पिंपळगाव येथून अवघ्या अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या भाकऱ्या नाल्यावरती पोचला असता नाल्यावरील पुलावरुन पुराचे पाणी ओसंडुन वाहात होते. दरम्यान या तरुणाने मोटरसाइकलसह पुल पार करण्याचा प्रयत्न केला असता मोटरसाइकलसह वाहून गेल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.हा तरुण वाहून गेल्याची वार्ता मिळताच त्याचे कुटुंबिय घटनास्थळी हजर झाले,घड़लेल्या घटनेची माहिती पोलिस तसेच महसुल अधिकाऱ्याना देण्यात आली.प्रशासनाच्या वतीने मृतक तरुणाचा शोध घेण्यात आला,परंतु शुक्रवारी त्याचा पत्ता लागला नाही.आज शनिवारी त्याचे कुटुंबिय तसेच गावकरी गजानन कुळसंगे यांनी पुन्हा शोध घेतला असता पुलाचे २०० मीटर अंतरावर अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला.जवळपासचे अंतरावर त्याची पैशन-प्रो बाइकसुद्धा मिळाली आहे.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.प्राथमिक तपास पोह. अनिल केकतपुरे . नापो. दिलीप पवार करीत आहे.आज दुपारी अमेष याचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!