प्रेमविवाह केल्याने आई वडिलांनी मुलीला घरातून फरफटत नेत केली मारहाण

0

Crime News
साहसिक न्युज 24:
मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या आई-वडिलांनी मुलीला बेदम मारहाण करत तिला फरफटत नेलं आहे. ही घटना अमरावतीतल्या अंबाडा गावात झाली आहे. सावरखेड या ठिकाणी एका १९ वर्षांच्या तरूणीचं अंबाडा येथील प्रतीक तडस या युवकाशी प्रेमसंबंध होते. या दोघांनी २८ एप्रिलला अमरावती आर्य समाज मंदिर येथे विवाह केला.
त्यानंतर मुलगी ४ मे रोजी घरून मुलांकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजताच मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले. त्यांनी मुलीला फरपटत,मारहाण करत उचलून नेले.
प्रतीकने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची मोर्शी पोलीस ठाण्यात केली. मात्र मागच्या तीन दिवसात पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. मात्र सोशल मीडिया वर हा व्हीडिओ व्हायरल होताच शुक्रवारी रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणलं आहे. या ठिकाणी या मुलीचा जबाब इन कॅमेरा नोंदवला जाणार आहे.
मुलीने आपल्याला इथंच राहायचं अशी दयायाचना केली. पण, आई-वडिलांनी तिचे काहीही ऐकले नाही. हात आणि पाय धरून मुलीला अक्षरश: घरातून उचलून नेलं. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणानंतर मुलाच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मुलीकडच्या नातेवाईकांविरुद्ध मोर्शी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!