बाजार समितीला दर्जेदार करण्यासाठी एड सुधीर कोठारी आदर्श प्रशासक.

0

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गौरवोद्गगार

हिंगणघाट बाजार समितीचा उपक्रम-एक हजार शेतकऱ्यांना सोलर झटका बॅटरीचे वितरण

हिंगणघाट : बाजार समिती ही राज्यात एका उत्तम दर्जाची आदर्श बाजार समिती म्हणून नावारूपाला येण्यासाठी अँड सुधीर कोठारी यांचे अभ्यासू व संयमी नेतृत्व कारणीभूत असून ही बाजार समिती राबवित असलेल्या योजना आज राज्यात आदर्शवत ठरल्या आहे .अशा शब्दात महाराष्टाचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी गौरवोद्गगार काढले. ते दि.4 डिसेंबरला कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे एक हजार शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्यात आलेल्या झटका बॅटरी कार्यक्रमाच्या वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी कापूस, सोयाबीन या पिकांना भाव नसल्याची खंत व्यक्त केली. राज्य व केंद्र सरकारने भाव देऊन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी केली. या बाजार समितीच्या प्रगतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती एड सुधीर कोठारी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार समीर कुणावार,माजी आमदार राजू तिमांडे, उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आमदार समीर कुणावार यांनी या बाजार समितीच्या प्रगतीचा वेलू उंच उंच जात असून शेतकरी हितासाठी ही बाजार समिती टिकली पाहिजे या उद्देशाने मी या बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांच्या समवेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बाजार समितीच्या कोल्ड स्टोअरेंजसाठी आपण राज्य सरकार कडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहून या बाजार समितीची भरभराट व्हावी यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले. माजी आमदार राजू तिमांडे यांनी बाजार समिती मधून शेतकरी वर्गाला मिळत असलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले.सभापती अँड सुधीर कोठारी यांनी या बाजार समितीने मागील 23 वर्षात केलेल्या गरुडभरारीची माहिती देऊन 70 कोटी वरून 23 शे कोटीच्या वार्षिक उलाढालीसाठी प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.व शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व घटकांना सोबत घेऊन ही बाजार समिती काम करीत असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांचे पीक जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचावे यासाठी शेताला कुंपण म्हणून झटका बॅटरी पन्नास टक्के अनुदानावर वाटप करण्याचा निर्णय घेऊन शेतकरीबंधूना या जनावरापासून थोडी मुक्ती देण्याचा बाजार समितीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक मधुसुदन हरणे यांनी शेतकरी हितांच्या विविध योजना साठी राज्य सरकार कडून आमदार कुणावार यांनी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.यावेळी समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर,माजी संचालक शेषकुमार येरलेकर, माजी पं. समिती सभापती गंगाधर कोल्हे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, राॅका हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, राॅका कामगार सेल जिल्हाध्यक्ष आफताब खान, रांका ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश काळे ,समद्रपुर नगर पंचायत अध्यक्षा सौ.योगिता सचिन तुळणकर, समुद्रपुर बाजार समिती उपसभापती वामनराव चंदनखेडे,हिंगणघाट खरेदी विक्री अध्यक्ष दिगांबर चांभारे, उपाध्यक्ष राजु भोरे, समुद्रपुर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र कुकेकार,भाजपा जिल्हा महासचिव आकाश पोहाणे,भाजपा तालुकाध्यक्ष विनोद विटाळे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,निलेश ठोंबरे, माजी नगरसेवक अशोक रामटेके ,नगरसेविका माया जीवतोडे,बाजार समितीचे संचालक मधुकरराव डंभारे, ओमप्रकाश डालिया, उत्तमराव भोयर, प्रफुल्ल बाडे, अशोक उपासे, राजेश मंगेकर, डॉ निर्मेश कोठारी, घनश्याम येरलेकर, पंकज कोचर, ज्ञानेश्वर लोणारे, शुब्रबुद्ध कांबळे, माधुरी चंदनखेडे, नंदा चांभारे, हर्षद महाजन, संजय कात्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक माडे यांनी तर आभारप्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती हरीश वडतकर यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने माजी समुद्रपुर बाजार समितीचे संचालक शांतीलाल गांधी, जनार्दन हुलके, महादेव बादले,अरुण बकाल, गणेश वैरागडे,नगरसेवक धनंजय बकाने, प्रकाश राऊत,संजय चव्हाण,अनिल भोंगाडे,राजेश धनरेल,सचिन तुळणकर,लिलाधर मडावी तेजस तडस, सुर्यकांत तिजारे,अमित लाजुरकर , सुनिल इंगोले,पंकज पाके, प्रविण कुडे, प्रविण काळे, मोठ्या प्रमाणात झटका बॅटरीचे लाभार्थी शेतकरीबंधु, बाजार समितीचे व्यापारी-आडतिये, पक्षाचे पदाधिकारी व हिंगणघाट व समद्रपुर तालुक्यातील कार्यकर्ते, कर्मचारी वृंद उपस्थित होते.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!