बापाचा पत्ता सांगितला नाही म्हणून खेळ केला खल्लास ; वर्ध्यात अल्पवयीन मुलांकडून हत्या…
Byसाहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे /वर्धा:
जुन्या वादातून घरापुढे राहणाऱ्या एका परिवाराने जावेद पठाण याचा धारधार शस्त्राने खून केला. ही ,घटना आज २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आनंदनगर पुलफैल भागात घडली. मिळालेल्या माहितीनुसार आनंदनगर भागातील लियागत अली आणि जावेद पठाण एकमेकांच्या घरापुढे राहतात. या दोघांमध्ये जुन्या वादातून नेहमी खटके उडत होते. दरम्यान आज सायंकाळी पुन्हा वाद पेटला. यात जावेद पठाण याला लियागत अली, त्याच्या दोन पत्नी व मुलाने एकत्र येत धारधार शस्त्राने मारहाण केली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वर्धा शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. वर्धेत गेल्या दोन महिन्यात 3 खून झाले. गेल्या अनेक दिवसातील आजचा हा सर्वात क्रूररिता केलेला खून असल्याची चर्चा आहे.