बेलगांव येथे पटले नामक महिला करते विषारी दारूची खुलेआम विक्री: पोलिस पाटील व सरपंच यांचा आशीर्वाद
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ वर्धा:
सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलगाव येथे पटले नामक महीलेच्या घरी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मोहा दारूची खुलेआम विक्री होत आहे.पटले नामक महिला मागील आठ ते दहा वर्षापासून मोहा दारूचा व्यवसाय करत आहे. परंतु सावंगी पोलीस स्टेशन आणि स्थानिक पोलीस पाटील, सरपंच यांच्या आशीर्वादामुळेच आज पर्यंत या दारू विक्रेता महिलेवर कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई करण्यात आले नसल्याचे गावातील नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी सांगितले. पटले महिला ही मोहा गावठी दारू मध्ये नशेचे आमली पदार्थ टाकत असल्याने गावातील नागरिकांच्या प्रकुति खराब होत आहे…यावर सावंगी पोलिसांनी या महिलेवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे…