बोपापूर (वाणी)येथिल नवदूर्गा भाविकांचे श्रध्दास्थान.
देवळी : तालुक्यातील वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला देवळी तालूक्यातील बोपापूर (वाणी)येथिल नवशक्ती अंबिका भंक्तीधाम हे भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे वर्धा,यवतमाळ, अमरावती,चंद्रपूर या जिल्ह्यातून भाविक मोठ्या संखेने येथे दर्शनासाठी येतात.तसेच देवळी तालूक्यातील वर्धा नदिच्या तिरावर बोपापूर (वाणी )हे एक छोटे-से गांव येथे अंबिका माता मंदिर अस्तित्ववात होते या मंदिरात नवरात्र,चैत्रात भाविक दर्शनास यायचे यात काही भाविकांची श्रध्दा व त्यांना मिळालेल्या आशिर्वादाने येथे भाविकांच्या देणगी रूपाणे येथे एक मोठे तिन एंकर जमिनीवर धाम तयार करण्यात आले व नवदूर्गा मंदिराची निर्मिती भाविकांच्या श्रध्देने करण्यात आली या धामला नवशक्ती अंबिका भंक्तीधाम नाव देण्यात आले येथे नवरात्रात आज ही हजारों भाविक मोठ्या संखेने दर्शनाला येतात व चैत्र मास मंध्ये भाविकांचा टांडा राहतात
मंदिर कमेटिचे अध्यक्ष मनोहर कारनकर यांनी येथे जानेवारी महिण्यामंध्ये ( शाकांबरी नवरात्र ) मोठ्या महायज्ञाने साजरे केल्या जात असल्याचे सांगितले या वेळी भाविक भंक्त मोठ्या संखेने येथे येतात
हे भंक्तीधाम राष्ट्रीय मार्गावर शिरपूर ( होरे)येथून ५ की मी.अंतरावर तर अंदोरी येथून २ की.मी.अंतरावर आहे.
सागर झोरे सहासिक न्यूज-24