ब्रेकिंग न्यूज-राष्ट्रीय महामार्गावरील सुगुणा कंपनी जवळली भीषण अपघातात एक ठार, तर आठ प्रवासी जखमी…

0

हिंगणघाट : .५ ऑक्टोबर येथील नागपूर – हैदराबाद महामार्गावर आर्वी (छोटी) शिवारातील सगुणा कंपनीजवळ भरधाव ट्रॅव्हल्स- बस पलटल्याने मोठा अपघात झाला.रस्त्यावरील खड्डा चुकविताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटी झाली.
पहाटे पाच वाजताच्या दरम्यान झालेल्या या अपघातात १ प्रवासी जागीच गतप्राण झाला तर एकूण ८ जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
ट्रॅव्हल्स क्र. सी बी १९ – एफ ३३६६ ही वातानुकूलित खाजगी बस हैदराबाद येथून रायपूरला निघाली असता हा दर्दैवी अपघात घडला.
या बसमधून एकूण २८ प्रवासी पुढील प्रवासाला निघाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली असली तरीही बसमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती या खासगी बसमधील प्रवस्यांनी दिली आहे.
सदर बस भरधाव वेगात हैद्राबादवरून रायपूरकडे निघाली असताना हिंगणघाट नजीकच्या छोटी आर्वीजवळ महामार्गावर असलेल्या खड्डयाचा अंदाज चालकाला आला नाही. ऐनवेळी निदर्शनास आलेला खड्डा चुकविताना बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हि खासगी बस पलटी झाली. यात एका प्रवाश्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. इतर गंभीर जखमी झालेल्या प्रवाश्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर काही किरकोळ जखमी प्रवाश्यांना दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवासाला धाडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीसचमू घटनास्थळी पोचून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर मृत पावलेल्या व्यक्तीचे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
या महामार्गावरून नागपूर,हैद्राबाद तसेच बेंगलोर जाणाऱ्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करीत असतात, या कडे परिवहन विभागाने तसेच राष्ट्रीय महामार्ग पोलीसांनी लक्ष देणे गरजेचे आहे, परंतु संबंधीत यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने या खाजगी बस वाहतुकीवर कोणताही अंकुश नाही, या मुळे भरघाव वेगाने चालणाऱ्या बसेसचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, अपघातात जखमी किंवा मृत प्रवाश्यांना विमाकंपनीचा लाभ मिळणेसुध्दा कठीण झालं आहे

ईकबाल पहेलवान सासिक न्यूज-24         हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!