🔥भरधाव ट्रकची कारला पाठीमागुन धडक; कारचे मोठे नुकसान, वृद्ध महिला गंभीर जखमी.
सिन्दी (रेल्वे)/बुट्टीबोरी -/ सेलु येथील वसंतराव शिदोडकर हे पत्नी,सासु यांच्या सह नागपुर येथील नातेवाईकांकडे आपल्या टाटा इंडिका क्र.MH32C6528 या चारचाकी गाडीने नागपुर ला जात असताना मोहगाव परिसरात शुक्रवार दि.१० जुलै ला दुपारी बाराच्या सुमारास अपघात घडला.झालेल्या एका अपघातात भरधाव कंटेनर ट्रकने कारला पाठीमागुन धडक दिल्याने कारचे मोठे नुकसान झाले. अपघातात कारची मागील काच पुर्णपणे फुटली असुन आणि मागील भाग चेंदामेंदा झाला आहे.
घटनेनंतर कंटेनर न थांबता नागपुर कडे पळाला. या अपघातात लिलाबाई ठाकरे वय९० रा. सेलु या गंभीर जखमी झाल्या असुन शारदा दिलीप खडसे ५४ यांच्या डोक्याला मार लागला तर ललिता वसंतराव शिदोडकर ५८ चालक वसंतराव शिदोडकर वय वर्ष ६२ हे किरकोळ जखमी झाले असुन सर्व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन जखमींवर उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघात झाल्यावर उपस्थित विद्यार्थी यांनी घटनेची माहिती बुट्टीबोरी पोलीसांना देताच जमादार मनोज वाघ, शिपाई राजहंस देवघडे यांनी धाव घेतली असुन पुढील तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बुट्टीबोरी पोलिस करीत आहे
“मोठा अनर्थ टळला!”
भरधाव ट्रकच्या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले, मात्र कारमधील प्रवासी थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.