भाजप द्वारे मोदी सरकारच्या ८ वर्षाच्या विकास पत्रिकेचे नागरिकांमध्ये वितरण

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी/वर्धा:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या ‘सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 8 वर्षे’ या अभियानाचे औचित्य साधत या आठ वर्षातील वर्धा जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना मिळालेल्या लभाचे विवरण सदर करण्यात आले.
कोरोना काळात वर्धा जिल्ह्यातील ८ लक्ष जनतेला मोफत अन्नधान्य, ५० हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन, १५ हजार हून अधिक लोकांना मालकीचे घर देणे, ३ लाखांहून अधिक जनधन खाती या सारख्या योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे, या विषय चे माहिती पत्रक भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट व विधान परिषद आमदार डॉ रामदास आंबटकर यांच्या उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांच्या सोबत घरोघरी वाटण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली.सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा ‘बलशाली राष्ट्र’ अशी तयार झाली असून वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे शक्य झाले आहे. असे प्रतिपादन विधान परिषद आमदार डॉ रामदास आंबटकर यांनी केले.
2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करणे, राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले. कायम अशांत असणा-या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. असे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी सांगितले.
या वेळी विधान परिषद आमदार डॉ रामदास आंबटकर यांच्या नेतृत्वात भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, याच बरोबर भाजप चे पवन परियाल, वरुण पाठक, प्रदीप सिंह ठाकूर, वंदना भुते, श्रेया देशमुख, पवन राऊत, श्रीधर देशमुख, सुरेश आहुजा , प्रशांत झलके, मनोज भूतडा, अभिषेक त्रिवेदि, कृष्णा जोशी यांच्या समवेत भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!