भारतीय सेनेत आदेश चंदनखेडे यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केला सत्कार.
हिंगणघाट : टेंभा येथील आदेश चंदनखेडे यांची भारतीय सेनेत निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
अत्यंत गरीब परिस्थितीत आदेश ने आपले शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण हिंगणघाट येथे पूर्ण केले. भारतीय सेनेत भरती होण्याचे स्वप्न ठरवून आपल्या आई वडीलाच्या सहकार्याने अभ्यास आणि शारीरिक मेहनत करून भारतीय सेनेत यश मिळवून आपल्या गावाचे तसेच हिंगणघाट तालुक्याचे रोशन केले. पुढील देशसेवेच्या कार्यात आदेशला यश प्राप्त होवो अशा शुभेच्छा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिल्या.राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आदेश चंदनखेडे यांचे शाल श्रीफळ व वृक्ष देऊन देऊन सत्कार केला.यावेळी सुनिल भुते,उपसरपंच प्रवीण कलोडे,पंकज मानकर,ज्ञानेश्वरजी चंदनखेडे,शांतारामजी वाघे,गजानन चंदनखेडे,ग्राम.प.सदस्य रंजीत गराडे, अंकुश वाघमारे आदी उपस्थित होते.
सहासिक न्यूज-24 वर्धा