मजुरांच्या झोपड्यावर चालविला ट्रॅक्टर
साहसिक न्यूज 24 :
प्रतिनिधी / वर्धा :
हिंगणघाट तालुक्यातील कान्होली शेत शीवारात काही दिवसापासून क्यानोलचे काम सुरू आहे.त्या कामावर असलेल्या मजुरांच्या मानसावळी येथील वसंत वैद्य यांच्या शेतात झोपड्या करून राहत होते. 16 मे ला कान्होली येथील प्रमोद इंगोले यांनी समंधीत ठेकेदारचा राग मनात धरून क्यानोलवर काम करणाऱ्या मजुरांच्या राहत्या झोपड्यांवरच ट्रॅक्टर चालवून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. ते एवढयावरच थांबले नाही तर एका झोपडीमध्ये झोपून असलेल्या मजूराच्या अंगावर ट्रॅक्टर नेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बबन वरुटकर यांच्या तक्रारीवरून अल्लीपुर पोलिसात आरोपी प्रमोद इंगोले विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.