मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना करावा लागतो तन नाशकांचा  वापर…

0

शेतकरी चिंताचूर,सततच्या पावसाने कापूस,सोयाबिन जमिनी बरोबरच.

भिडी -/ सततच सूरू असलेल्या पावसाने शेतातिल कापूस ,सोयाबिन ही पिके जमिनी बरोबरच असल्याने व त्यात पावसामूळे वाढत असलेले तन व त्यावर होत असलेल्या अवाढव्य खर्चाने शेतकरी चितांचूर झाला आहे शेतात पावसामूळे ना निंदन ना डवरनी अस्यातच विवीध व महागडे तननाषकांचा वापर करून पिके अजूनही शेत जमिनीच्या बरोबरच दिसत असल्याने कापूस,सोयाबिन ही पिके होईल की नाही या विवेचनेत शेतकरी वावरत आहे
भिडी परीसरात सतत ३०ते ३५ दिवसा पासून दिवसा कधी रात्री पाऊस पडतच आहे शेतातील दलदली मूळे शेतक-यांना शेतातिल कोणतेही काम करने कठिण झाले आहे यातच कापूस, सोयाबीन यांची लागवड जूलै महिण्याच्या पहील्या आठवड्यातच करण्यात आली पिके बहरू लागली होती पिके दहा ते बारा दिवसांचे असतांनाच पावसाने सततची हजेरी लावल्याने व ढगाळ वातावरण पिकांना सूर्य प्रकाश न मिळाल्याने पिकांची वाढ खूटली पिके आज ही शेताच्या जमीनी बरोबरच दिसत असल्याने पिके होईल की ?नाही या विवेचनेत शेतकरी वावरत आहे
सतत येत असलेल्या पावसाने शेतातिल पीकात तन वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतातील कापूस, सोयाबिन पिके दिसेनासे झाल्याने वेळेवर मजूर न मिळने अस्यात विवीध प्रकार चे तननाषके घेवून फवारणी करून उभ्या पिकांना खूले केले यात झालेल्या अवाढव्य खर्चाने व केलेल्या खर्चा पूरते पीक होईल की नाही या चिंतेत शेतकरी वावरत आहे याकडे शासनानी लंक्ष देवून ओला दूष्काळ जाहीर करावा असी मागणी होत आहे.

राजू वाटाणे साहसिक news-24 भिडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!